जगातील सर्वात उंच शिव मंदिराला धोका?, १२,८०० फुट उंचीवर वसलेले तुंगनाथ मंदिर ६ अंशाने झुकले

Highest SHIVA Temple In The World: पुरातत्व विभागाने जारी केलेल्या एका अहवालात उत्तराखंडमध्ये असलेल्या तुंगानाथ शिवमंदिराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील सर्वात उंच शिवमंदिर ४ ते ६ अंशाने झुकले आहे.   

Updated: May 17, 2023, 01:51 PM IST
जगातील सर्वात उंच शिव मंदिराला धोका?, १२,८०० फुट उंचीवर वसलेले तुंगनाथ मंदिर ६ अंशाने झुकले title=
WorldS Highest Shiva Temple Tungnath In Uttarakhand Tilting By 6 10 Degrees Asi

उत्तराखंडः देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड राज्यात जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. (World Highest Shiva Temple In India)  हिमालयमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात १२ हजार ८०० फुटांवर वसलेल्या तुंगनाथ (Tungnath) मंदिराबाबत भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) अलीकडेच एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. जगातील सर्वात उंच शिव मंदिर असलेले तुंगनाथ ४ ते ६ अंशाने झुकले आहे. त्याचबरोबर परिसरात असलेले लहान मूर्त्या आणि बांधकामही १० अंशापर्यंत झुकले आहे. 

भारतीय पुरातत्व विभागाने अलीकडेच एक संशोधन मोहिम राबवली होती. या मोहिमेदरम्यान तुंगानाथ मंदिराबाबतचे सत्य समोर आलं आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ केंद्र सरकारना याबाबत माहिती दिली आहे. तसंच, मंदिर संरक्षित स्मारक घोषित करावे, असा सल्ला पुरातत्व विभागाने केंद्र सरकारला दिला आहे. 

केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

पुरातत्व विभागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्र सरकारने मंदिर राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याचा दाखला देत संरक्षित स्मारक घोषित करण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत. केंद्राकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मंदिराला नेमक्या कोणत्या कारणामुळं नुकसान पोहोचले आहे याचे कारण शोधण्यात यावे. जेणेकरुन तातडीने मंदिराच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतील, असं या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. पुरातत्व विभागाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

देहरादून विभागाचे पुरातत्व विभागाचे अधिकारी मनोज कुमार सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी सर्वेक्षण विभाग मंदिराच्या नुकसानीचे मुळ कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन मंदिराचे तातडीने संवर्धन करता येईल. तसंच, मंदिर परिसराची पाहणी करुन सविस्तर अहवाल सादर केला जाईल. मंदिराखालचा भाग खचण्याची भितीही एआयएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तशी चाचपणी अधिकारी करत आहेत. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर नुकसान झालेली जागा दुरुस्त करण्यात येईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?

जगातील सर्वात उंच शिव मंदिर

दरम्यान, तुंगनाथ हे जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. १२, ८०० फुट उंचीवर हे मंदिर वसले आहे. आठव्या शतकात कत्युरी शासकांनी या मंदिराची बांधणी केली आहे. सध्या हे मंदिर बद्री-केदार समितीच्याअतर्गंत आहे. या मंदिराचा कारभार बद्री-केदार ट्रस्टकडून सांभाळला जातो. पुरातत्व विभागाकडून बद्री-केदार ट्रस्टलाही यासंदर्भात एक पत्र पाठवण्यात आले आहे. 

मान्सून लांबला, Maharashtra तील तापमानानं 40 आकडा ओलांडला ; हवामान बदलांमुळं नागरिक हैराण

बद्री- केदार ट्रस्ट निर्णय घेणार

बद्री-केदार ट्रस्टचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अलीकडेच आमची एक बैठक पार पडली आहे. सर्व सदस्यांनी पुरातत्व विभागाचा प्रस्ताव फेटाळला आहे. मंदिराचे मुळ स्वरुपात संवर्धन करण्यासाठी आम्ही पुरातत्व विभागाची मदत घेण्यास तयार आहोत. परंतु आम्ही मंदिर पुर्णपणे त्यांच्या हातात सोपवू शकत नाही. आमचा निर्णय आम्ही लवकरच त्यांना कळवू.