World Photography Day : फोनमधून फोटो काढून या वेबसाइटच्या माध्यमातून कमवा पैसे

आज जागतिक फोटोग्राफी डे 

Updated: Aug 19, 2020, 03:22 PM IST
World Photography Day : फोनमधून फोटो काढून या वेबसाइटच्या माध्यमातून कमवा पैसे  title=

मुंबई : आज World Photography Day आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्हाला पैसे कमविण्याची चांगली संधी मिळत आहे. कारण आता 'पॅशन' तुमचं 'प्रोफेशन' बनणार आहे. याकरता तुम्हाला महागड्या कॅमेऱ्याची गरज नाही. फक्त १२ हजार रुपयांत तुम्ही ४८ मेगापिक्सल स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही फोटोग्राफी करू शकतात. 

123RF 

जर तुम्हाला फोटोमधून ऑनलाइन पैसे कमवायचे असतील तर 123RF आपलं अकाऊंट बनवू शकतात. तेथे तुम्ही तुमचा फोटो तेथे अपलोड करू शकता. ही वेबसाईट तुमचा फोटोतून 60% भाग तुम्हाला मिळणार आहे. 

Alamy 

ही वेबसाइट प्रत्येक फोटोला ५०% टक्के भाग घेऊ शकता. पण हा पैसा तुम्हाला तेव्हा मिळणार जेव्हा फोटो कुणी डाऊनलोड करेल. 

AnimalsAnimals.com 

ही वेबसाईट फक्त जनावरांच्या फोटोसाठी खास बनवली आहे. जर तुम्हाला जनावरांचे फोटो काढण्याची आवड असेल तर ही योग्य संधी आहे. या फोटोचे तुम्हाला ५०% पैसे तुम्हाला मिळणार आहे. 

Photocrowd 

ही वेबसाइट तुम्हाला असाइनमेंट देते. ज्यामुळे तुम्हाला तसे फोटो काढून तेथे अपलोड करायचे आहेत. जर ग्राहकांनी हा फोटो खरेदी केला तर तुम्हाला Paypal च्या माध्यमातून १६०० रुपये मिळतील.