आई होण्यासाठी भारतातील 'या' गावात येतात परदेशी महिला; 'आर्य वंश' येथेच असल्याची मान्यता

World News : सतत कुठे न कुठे नव्या ठिकाणांवर भेट देणाऱ्या अनेकांसाठीच काही स्थळं ही कायमच कुतूहलाचा विषय ठरतात. भारतातही अशी कैक ठिकाणं आहेत.   

सायली पाटील | Updated: Oct 13, 2023, 04:46 PM IST
आई होण्यासाठी भारतातील 'या' गावात येतात परदेशी महिला; 'आर्य वंश' येथेच असल्याची मान्यता title=
world news foreign women come to this ladakh village to conceive know more about the aryan Valley of brokpa tribe

Travel News : तुम्ही कुठंकुठं फिरला आहात? असा प्रश्न कोणी विचारला तर, आपण अगदी सहजपणे आपण ज्या ज्या ठिकाणी भेट देऊन आलो आहोत त्यांची नावं सांगतो. तर काही ठिकाणी जाण्याची इच्छा व्यक्त करतो. काही ठिकाणं तर अशीही असतात जी फक्त आपल्यासाठीच नव्हे तर, संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय ठरतात. असंच एक ठिकाण किंबहुना अशी बरीच ठिकाणं भारतातही आहेत. पण, आपण आज अशा एका ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत जिथं परदेशी महिला आई होण्यासाठी येतात. 

जगातील शेवटचे आर्य वंश 

लडाखमधील (Ladakh) दूरवरच्या खेड्यामध्ये असणारी जवळपास 5 ते 8 हजार जणांची वस्ती, स्वत:ला आर्य वंशज म्हणवत असून, त्यांच्या दाव्यानुसार ही मंडळी जगातील शेवटचे शुद्ध आर्य आहेत. लेहपासून उत्तर पश्चिमेला गेलं असता डोक्यात येणारं सर्वात पहिलं ठिकाण म्हणजे कारगिल. पण, लेहपासून बटालिक आणि त्यानंतर सिंधू नदीच्या किनाऱ्यावरून जाणाऱ्या आणि पुढे लागणाऱ्या कच्च्या आणि मधूनच येणाऱ्या पक्क्या रस्त्यावरून जात असताना गारकोन गाव लागतं. याच वाटेवर पुढं येतात दाह, हनु गावं. भारतीय लष्कराच्या परवानगीशिवाय या गावात प्रवेश करता येत नाही. 

दावा काय सांगतो? 

लडाखमध्ये शुद्ध आर्य (Aryans) वंशजांचे हे समुदाज आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे ब्रोक्पा. या समुदायातील बऱ्याच प्रथा हिंदू संस्कृतीशी मिळत्याजुळत्या आहेत. पण, वसंत ऋतू येताच हा समुदाय वेगळ्याच अर्थानं बहरतो. असं म्हणतात की या देशात परदेशातील अनेक महिला अपत्यप्राप्तीसाठी येतात. इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं लडाखमधील सिंधू नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या  बियामा, दाह, हनु आणि दारचूक गावाची प्रचिती जगभरात पसरली आणि पाहता पाहता इथं येणाऱ्या परदेशी नागरिकांचा आकडा वाढला. इथं येऊन येथील पुरुषांशी (जे आपण आर्य असल्याचा दावा करतात) संबंध ठेवून आर्यांप्रमाणंच मुलांना जन्म देतील. 

हेसुद्धा वाचा : जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल

 

ब्रोक्पा (Brokpas) समुदायातील पुरुष हे उंच असतात, त्यांची अंगकाठी कमाल असते. ही मंडळी निसर्गाची पूजा करतात. लडाखच्या इतर भागातील पुरुषांशी किंवा एकंदर नागरिकांपासून त्यांचे चेहरे वेगळेच असता. या बोक्पा समुदायावर वैदिक संस्कृतीचा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं. 

लडाखमधील ब्रोक्पा समुदाय दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात बोनोना नावाचा उत्सव साजरा करतो. पण, पाकिस्तानी भागात असणाऱ्या ब्रोक्पांनी आता इस्लाम स्वीकारल्याचंही म्टलं जातं. आजच्या काळातही आधुनिक युगापासून दूर असणारा हा समुदाय जगासाठी कोडंच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.