भारतीय लष्करात उत्कृष्ट भूमिका पार पाडणाऱ्या रणरागिनी

आतापर्यंत भारतीय लष्करात अनेक रणरागिणींनी उत्कृष्ट भूमिका पार पाडली आहे. काहींनी तर जीवाची बाजी लावत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. अशाच काही रणरागिणींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

Updated: Jun 6, 2017, 04:47 PM IST
भारतीय लष्करात उत्कृष्ट भूमिका पार पाडणाऱ्या रणरागिनी title=

नवी दिल्ली : आतापर्यंत भारतीय लष्करात अनेक रणरागिणींनी उत्कृष्ट भूमिका पार पाडली आहे. काहींनी तर जीवाची बाजी लावत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. अशाच काही रणरागिणींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

पुनिता अरोरा

लष्कराच्या दुस-या क्रमांकावरच्या पदावर विराजमान झालेल्या पुनिता अरोरा या पहिल्या भारतीय महिला आहेत. लेफ्नंट जनरल रँक मिळालेली ती पहिली महिला आहे. आर्मीनंतर त्या नेवीत रुजू झाल्या. तिथेही त्यांनी वाईस अॅडमिरलचं पद भूषवलं. Armed Forces Medical College च्या त्या कमांडंट होत्या.

पद्मावती बंडोपाध्याय

वायूदलातल्या पहिल्या एअर मार्शल होण्याचा मान पद्मावती बंडोपाध्याय यांना मिळतो. 1968 मध्ये त्या भारतीय वायूदलात रुजू झाल्या. 1978 साली त्यांनी डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेजचा कोर्स पूर्ण केला आणि वायूदलातल्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. उत्तर ध्रुवावर जाऊन त्यांनी शरीरशास्त्रासंदर्भातलं महत्त्वाचं संशोधनही केलं.

मिताली मधुमिता 

लेफ्नंट कर्नल मधुमिता लष्कराचं शौर्यपदक मिळवणारी पहिली महिला ठरली. फेब्रुवारी २०११ मध्ये तिचा शौर्यपदक देऊन गौरव करण्यात आला. लष्कराला देण्यात येणा-या इंग्रजी प्रशिक्षण टीमची मधुमिता प्रमुख होती. २०१० मध्ये लष्कराची ही टीम काबूलमध्ये असताना काबूलमधल्या भारतीय दूतावासावर हल्ला झाला. त्यावेळी मधुमिता दोन किलोमीटर धावत गेली. हल्ला झालेल्या दूतावासात तीच सगळ्यात आधी पोहोचली. तिनं स्वतः १९ भारतीय लष्करी अधिका-यांची सुटका केली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

प्रिया झिंगान

लष्करात कॅडेट म्हणून भर्ती होणारी पहिली महिला प्रिया झिंगान. २१ सप्टेंबर १९९२ ला भारतीय लष्करात रुजू होणारी ती पहिली महिला कॅडेट. कायद्याची पदवीधर असणा-या प्रियानं लष्करात जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. महिलांचाही लष्करात समावेश व्हावा, यासाठी तिनं स्वतः लष्करप्रमुखांना पत्र लिहिलं. साधारण वर्षभरानंतर प्रियाची ही मागणी लष्करानं मान्य केली, आणि प्रियासह २४ महिला कॅडेट पहिल्यांदाच लष्करात रुजू झाल्या. त्यामध्ये प्रिया झिंगानचा कॅडेट नंबर होता ००१

दिव्या अजिथ कुमार

दिव्या अजिथ कुमार वयाच्या21 व्या वर्षी  तिच्याबरोबरच्या 244 कॅडेटसमध्ये अव्वल ठरली. बेस्ट ऑल राऊण्ड कॅडेट मिळवणारी ती पहिली महिला. महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांमध्ये दिव्या सर्वोत्तम कॅडेट ठरली. कोवेटेड स्वॉर्ड ऑफ ऑनर देऊन तिचा सन्मान करण्यात आला. स्वॉर्ड ऑफ ऑनर हा कॅडेट प्रशिक्षणातला सर्वोच्च सन्मान आहे. त्यासाठी खडतर शारीरीक चाचणी, स्वीमिंग टेस्ट, अडथळ्यांची शर्यत, ड्रील टेस्ट अशा अतिशय खडतर चाचण्या पार कराव्या लागतात. या सगळ्यांमध्ये तिनं तिच्या पुरुष बॅचमेटसनाही मागे टाकलं. २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणा-या संचलनात तिनं १५४ महिला अधिका-यांचं नेतृत्व केलं.

निवेदिता चौधरी

फ्लाईट लेफ्नंट निवेदिता. वायुदलातली एव्हरेस्ट गाठणारी पहिली महिला अधिकारी. ऑक्टोबर २००९ मध्ये माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणारी ती वायुदलातली पहिला महिला अधिकारी ठरली. 

अंजाना भादुरिया
 

भारतीय लष्कराचं गोल्ड मेडल मिळवणारी अंजाना भादुरिया ही पहिली महिला अधिकारी. मायक्रॉ़बायोलॉजीमध्ये एमएसस्सी केल्यावर तिनं लष्करात रुजू होण्यासाठी अर्ज केला. 1992 साली लष्करात पहिल्यांदा महिला कॅडेटसचा समावेष करण्यात आला. त्यामध्ये अंजाना यांचा समावेश होता. लष्करी प्रशिक्षणात त्यांनी सगळ्याच पातळ्यांवर आघाडी घेतली. त्यांच्या याच कामगिरीबद्दल गोल्ड मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

प्रिया सेमवाल

पती शहीद झाल्यानंतर लष्करात रुजू होणारी प्रिया सेमवाल ही पहिली महिला. अरुणाचल प्रदेशजवळ घुसखोरांबरोबर झालेल्या चकमकीत प्रियाचा नवरा अमित शर्माला वीरमरण आलं. त्यावेळी चार वर्षाच्या ख्वाईशची आई असलेल्या प्रियानं नव-याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लष्करात जाण्याचा निर्धार केला. आणि 2014 मध्ये हा निर्धार खरा करुन दाखवला. 

दीपिका मिश्रा 
लष्कराच्या सारंग हेलिकॉप्टर्सच्या एरॉबॅटिक टीममध्ये पायलट म्हणून समावेश झालेली दीपिका ही पहिली महिला पायलट. हेलिकॉप्टर्सच्या कसरती नेहमीच दीपिकाला प्रेमात पाडायच्या. त्यातूनच ती 2010 साली ती एरॉबॅटिक टीममध्ये पायलट म्हणून रुजू झाली. 

स्वाती सिंग

अतिशय दुर्गम अशा नाथुला पास या पोस्टवर पोस्टिंग होणारी स्वाती सिंग ही पहिली महिला. 2012 मध्ये नाथु ला पास पोस्टवर तैनात असलेल्या 63 ब्रिगेडमध्ये स्वाती ही एकमेव महिला होती. स्वाती ही इंजिनिअर आहे. मल्टिनॅशनल कंपनीतली उच्चपदस्थ आणि उत्तम पगाराची नोकरी नाकारुन तिनं लष्करात करिअर केलं. नाथु ला पास पोस्टवरच्या लष्कराच्या कम्युनिकेशन लाईन्स सांभाळणं हे स्वातीचं काम होतं. अर्थात 24 तासांचं हे अतिशय जोखमीचं काम होतं.

12. गुंजन सक्सेना 

कारगिल युद्धात गुंजन सक्सेनानं अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली. युद्ध भूमीवर उड्डाण करणारी ती पहिली महिला पायलट. न1994 मध्ये भारतीय वायूदलाची महिला पायलटची तुकडी सज्ज झाली. त्यामध्ये गुंजनचा समावेष होता. कारगिल युद्धादरम्यान, तिनं जवानांना हवी ती मदत पुरवण्यासाठी, पॅकेटस टाकण्यासाठी आमि जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून आणण्यात मोठी मदत केली. तिच्या या कामगिरीबद्दल शौर्य वीर पदकानं तिचा गौरव करण्यात आला.