लग्नानंतर महिलेला कळले पतीचे धक्कादायक सत्य, तर सासऱ्यांनी बंदुकीच्या जोरावर...

Woman Accuses Father In Law Of Molestation: लग्नाला एक महिना झाल्यानंतर महिलेने सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 15, 2023, 12:23 PM IST
लग्नानंतर महिलेला कळले पतीचे धक्कादायक सत्य, तर सासऱ्यांनी बंदुकीच्या जोरावर... title=
women filed a molestation complaint against father in law

Woman Accuses Father In Law Of Molestation: लग्नाच्या एक महिन्यातच हुंड्यासाठी नवविवाहित महिलेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. हुंडा न मिळाल्याने सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप करत महिलेना पोलिस स्थानकात धाव घेतली. तर, पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा शहरात ही घटना घडली असून पोलिसांनी महिलेच्या सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेचा पती गतीमंद आहे. तर, सासरे बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्ती खोलीत घुसून छेड काढतात. तर कधी हात पकडतात. त्यांना विरोध केल्यास त्यांनी धमकी दिल्याचंही तिने तक्रारीत नमूद केलं आहे. तसंच, पती मानसिक दृष्ट्या अस्थिर असून तो या सगळ्या प्रकरणी काहीच बोलत नाहीत, असंही तिने म्हटलं आहे. 

६ मे रोजी महिलेचे लग्न झाले आहे. लग्नाला एक महिना होत नाही तोवर सासरच्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या वडिलांनी त्यांची क्षमता नसताही सासरी हुंडा दिला. मात्र, तरीही ते समाधानी नाहीत. मी सारची येताच त्यांनी बाईक आणि सोन्याची चेन मागण्यास सुरुवात केली. त्यावर मी ठाम नकार दिला. त्याचा राग मनात ठेवून माझा रोज छळ करण्यास सुरुवात केली, असं महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. 

नवविवाहितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिला लग्नानंतर तिच्या पतीबद्दलचे सत्य कळले आहे. तिचा पती गतीमंद आहे. लग्नाच्या आधी ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवण्यात आली होती. लग्नानंतर मी माहेरी गेली तेव्हा माझ्या माहेरीही मी ही गोष्ट सांगितली होती.

पीडित महिलेच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. नवऱ्या मानसिक अवस्था ठिक नसल्याने सासरे माझी छेड काढायचे. एक दिवस मी माझ्या खोलीत झोपली असताना सासरे खोलीत आले आणि दार लावून घेतले. त्यानंतर माझ्यावर बंदुक रोखत मला चुकीच्या रितीने स्पर्श करण्यास सुरुवात केली, असं नवविवाहितेने म्हटलं आहे. 

पीडितेने जेव्हा सासऱ्याला विरोध केला तेव्हा त्याने तिला धमकावले. या घरात राहायचे असेल तर मी सांगेन तसंच करावं लागेल, अशा शब्दांत मला धमकी दिली. मी जेव्हा माझ्या पतीला त्यांच्या वागण्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ते माझ्या सासरच्यांनाही काही बोलले नाहीत, असं तिने म्हटलं आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी पिडीतेला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसंच, तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, या प्रकरणी अधिक तपास करत असून आरोपींविर कठोर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.