चक्क महिलेला भेटले प्रभू श्रीराम!! लोटांगण घालत घेतलं दर्शन; पाहा Video

प्रभू श्रीरामांना पाहून महिलेला अश्रू अनावर

Updated: Oct 1, 2022, 10:58 AM IST
चक्क महिलेला भेटले प्रभू श्रीराम!! लोटांगण घालत घेतलं दर्शन; पाहा Video  title=

रामानंद सागर (ramanand sagar) यांच्या ‘रामायण’ (ramayan) मालिकेचे वेड प्रेक्षकांमध्ये आजही असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला दूरदर्शनवर (doordarshan) रामायण ही मालिका सुरू झाली की रस्ते सुनसान व्हायचे. लोक सगळी कामे सोडून टीव्हीला (TV) चिकटून बसायचे. प्रत्येक घरात टीव्हीही नव्हता त्यामुळे शेजारच्यांच्या घरात जाऊन लोक रामायण पाहायचे. या मालिकेच्या लोकप्रियतेने त्यातील पात्रांनाही अमर केले आहे. रामायण (ramayan) या टीव्ही सीरियलमध्ये अरुण गोविल (arun govil) यांनी रामाची (Ram) भूमिका साकारली होती तर दीपिका चिखलिया (deepika chikhalia) यांनी सीतेची (Sita) भूमिका साकारली होती. त्यावेळी या पात्रांची घरोघरी पूजा केली जात होती. (Woman touches ramayan Lord Ram arun govil feet in airport)

मात्र आजही लोक प्रभू श्रीरामाची (Ram) भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल (arun govil) यांना विसरलेले नाहीत. आजही लोक त्यांना प्रभू रामाच्या भूमिकेतच पाहतात. त्याचाच प्रत्यय शुक्रवारीही आला. अरुण गोविल हे संभाजीनगर येथे पोहोचले होते. विमानतळावर अरुण गोविल यांच्या सन्मानार्थ, एका महिलेने त्याच्या पायाशी लोटांगण घातलं.  जणू त्या महिलेला रामाचे दर्शन झाल्याची भावना या महिलेच्या मनात होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अरुण गोविल संभाजीनगरमध्ये (sambhaji nagar) रामलीला कार्यक्रमासाठी आले होते. ते विमानतळावरून (airport) जात असताना एका महिलेने त्यांना पाहिले. या महिलेने टीव्हीवर रामच्या भूमिकेत अभिनेत्याला प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ती स्वतःला आवर घालू शकली नाही. अरुण गोविल यांना पाहून तिने त्यांच्या चरणी डोकं ठेवलं. यावेळी महिलेला अश्रूही अनावर आले. अरुण गोविल यांनी महिलेला उठण्याची विनंती केली. त्यानंतर महिलेने एकत्र फोटोसाठी पोज दिली.

दरम्यान,  34 वर्षांनंतर अभिनेता अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया पुन्हा एकदा भगवान राम आणि माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. माध्यमांच्या वृत्तांनुसार हे कलाकार दिल्लीतील कड़कड़डूमा येथील रामलीलाच्या मंचावर पुन्हा एकदा भगवान राम आणि सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.