Crime News : आई आणि लहान भावाच्या मृतदेहासोबत तो रात्रभर... थरकाप उडवणारी घटना

आई आणि लहान भावाच्या मृतदेहासोबत दहा वर्षाचा मुलगा रात्रभर झोपून राहिला होता. सकाळी ग्रामस्तांनी जेव्हा या मुलाला मृतदेहांसोबत पाहिले तेव्हा त्यांचा थरकाप उडाला. 

Updated: Jan 22, 2023, 04:07 PM IST
Crime News : आई आणि लहान भावाच्या मृतदेहासोबत तो रात्रभर... थरकाप उडवणारी घटना title=

Jharkhand Crime News : आई आणि लहान भावाच्या मृतदेहासोबत एक दहा वर्षाचा मुलगा झोपला. झारखंडमध्ये ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे (Jharkhand Crime News). सकाळी ग्रामस्थांनी अंगणात आई आणि लहान भावाचा मृतदेह पाहिला. या दोन्ही मृतदेहांच्या बाजुलाच हा मुलगा झोपला होता. हे दृष्य पाहून ग्रामस्थांना धक्का बसला. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.

झारखंडमधील  पलामूपासून 90 किमी अंतरावर असलेल्या मनाटू पोलीस स्टेशन हद्दीतील रंगेया गावात ही घटना घडली आहे. पलामू जिल्ह्यात ही घटना घडली. मृत महिलेला आठ वर्षाचा कुणाल आणि दहा वर्षाची छोटू अशी दोन मुल आहेत.  दोन मुल आणि पतीसह ती राहत होती. तिच्या पतीचे विवाहबाह्य संबध होते. यावरुन दोघांमध्या सतत भांडण होत असतं.

या वादातून महिलेने मुलांसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरात कुणी नसताना या महिलेने साडीचा फास बनवला. आपण झोका खेळूया असं म्हणत महिलेने मुलांना साडीच्या फासावर लटकवले. यानंतर स्वत: देखील गळफास घेतला. यात महिलेसह तिच्या आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मात्र, दहा वर्षाचा मुलगा यात बचावला. यानंतर या दहा वर्षाच्या मुलाने आई आणि लहान भावाचा मृतदेह अंगणात नेऊन अंथुरणावर झोपवला. यानंतर तो देखील या मृतदेहांच्या बाजूला झोपी गेला. तो रात्रभर या मृतदेहांच्या शेजारी झोपून राहिला.

सकाळी ग्रामस्थांनी प्रकार पाहिला. त्यांनी महिलेला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दहा वर्षाच्या छोटूने सर्व प्रकार ग्रामस्थांना सांगितला. यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी दाखल. त्यानी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. छोटूची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणी अधित तपास करत आहेत. मृत महिलेच्या पतीला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.