मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलं

उत्तरप्रदेशातील बलियामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मुक्या पत्नीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं चित्र काढलं म्हणून चिडून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलंय. 

Updated: Sep 9, 2017, 06:24 PM IST
मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलं title=

अलाहाबाद : उत्तरप्रदेशातील बलियामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मुक्या पत्नीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं चित्र काढलं म्हणून चिडून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलंय. 

२४ वर्षांच्या नगमा परवीनला बोलता येत नाही... परंतु, ती आपल्या मनातल्या गोष्टी कागदावर चित्राच्या रुपात रंगवते. सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल तलाकला 'असंवैधानिक' ठरवल्यानंतर नगमानं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं चित्र रेखाटलं आणि ते पतीला दाखवलं... पण, याचा परिणाम तिला भोगावा लागला.

हे चित्र कारण ठरलं आणि नगमाकडे सतत हुंड्याची मागणी करणाऱ्या तिच्या पतीनं आणि सासरच्या मंडळींनी मारहाण करत तिला घराबाहेर काढलंय. नगमाचे वडील मोहम्मद समशेर खान यांनी पोलिसांत याबद्दलची तक्रार दाखल केलीय. 

नगमानं यापूर्वीही २० जुलै रोजी सासरी हुंड्यासाठी छळ करण्यात येत असल्याची तक्रार नोंदवली होती.