फक्त 24 तास टीव्ही पाहून कमवा 1.8 लाख रुपये, कंपनीची अजब ऑफर

आपल्याला जीवन जगण्यासाठी पैशांची गरज असते आणि पैसे कमावण्यासाठी काम करण्याची गरज असते.

Updated: Apr 11, 2022, 08:28 PM IST
फक्त 24 तास टीव्ही पाहून कमवा 1.8  लाख रुपये, कंपनीची अजब ऑफर title=

मुंबई : आपल्याला जीवन जगण्यासाठी पैशांची गरज असते आणि पैसे कमावण्यासाठी काम करण्याची गरज असते. ज्यासाठी आपल्याला मेहनत आणि बुद्धी दोन्हींचा वापर करावा लागतो. परंतु तुम्हाला जर कोणी सांगितलं की, तुम्हाला फक्तं रिकामी बसण्याचे पैसे देणार आहोत म्हणून... तर? आता तुम्ही म्हणाल असं कधी असतं का? रिकामी बसण्याची कसे काय पैसे मिळू शकतात? तुमचा विश्वास बसत नसला तरी, हे खरं आहे.

एक अशी कंपनी आहे, जी आपल्याला 24 तास बसून टीव्ही बघण्यासाठी 1.8 लाख रुपये पगार देत आहे. बसल्या बसल्या टीव्ही पाहायला कोणाला आवडत नाही आणि त्यात काहीही न करता पैसे मिळणार असतील तर मग आयुष्यात आणखी काय पाहिजे?

हा जॉब MagellanTV देत आहे. लोकांना देत आहे. ज्यामध्ये तुम्हाला सत्य घटनांवर आधारीत स्टोरी पाहायच्या आहेत.

MagellanTV ही एक स्ट्रीमिंग सेवा आहे जी गुन्हेगारी घटनांबद्दल माहितीपट प्रसारित करते. या कंपनीकडून लोकांना ऑफर दिली जात आहे की, जर कोणी त्यांच्या गुन्ह्यावर आधारित डॉक्युमेंटरी 24 तास पाहत असेल, तर त्याला 2,400 डॉलर म्हणजेच 1.8 लाख रुपये दिले जातील. ही ऑफर MagellanTV ने सलग तिसऱ्या वर्षी दिली आहे.

ते काही निवडक लोकांना संपूर्ण दिवस डॉक्युमेंटरी पाहण्याची आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्याची परवानगी देतील. कंपनीने सांगितलेलं हे काम सोपं वाटत असेल, तरी देखील दिवसभर अशा भयानक कथा सहन करणे आणि पाहाने अजिबात सोपे नाही. हे आव्हान जितके मनोरंजक आहे तितकेच ते पूर्ण करणे कठीण आहे. 

कंपनीचे असे म्हणणे आहे की, एखाद्या उमेदवाराने हे कार्य पूर्ण केले, तर त्याला केवळ 1.8 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार नाही, तसेच एक वर्षासाठी MagellanTV चे सदस्यत्व देखील विनामूल्य दिले जाईल.

कंपनीचे म्हणणे आहे की, आमच्यासाठी आदर्श उमेदवार सर्वात धोकादायक सिरीयल किलर्स आणि भुताटकीच्या कथांचा सामना करण्यास सक्षम असेल. हे सर्व पाहिल्यानंतरही त्याला डॉक्युमेंट्री पाहण्याचे धाडस होईल. जर कोणाला स्वतःवर इतका विश्वास असेल, तर तो या आव्हानासाठी अर्ज करू शकतो.