Wipro वर गुंतवणूकीआधी अत्यंत महत्वाची माहिती; तुफान कमाईसाठी एक्सपर्ट्सचा सल्ला

Wipro Buy Call update : जर तुम्ही गुंतवणूकीसाठी विप्रोच्या शेअरचा विचार करीत असाल तर, त्यासाठी एक्सपर्ट्सने काही महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत, ते जाणून घ्या...

Updated: Feb 22, 2022, 12:20 PM IST
Wipro वर गुंतवणूकीआधी अत्यंत महत्वाची माहिती; तुफान कमाईसाठी एक्सपर्ट्सचा सल्ला title=

मुंबई : आयटी सेक्टरमधील दिग्गज कंपनी विप्रोने सोमवारच्या व्यवहारात 1.50 टक्क्याहून जास्त तेजी नोंदवली. विप्रोचा शेअर फोकसमध्ये असल्याने ब्रोकरेज फर्म्सने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजच फर्म CLSA ने विप्रोवरील रेटिंग वाढवली आहे. नवीन लक्ष्य देखील दिले आहेत. या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या शेअर फोकसमध्ये का आहे ते...

विप्रोवर ब्रोकरेज फर्मचा सल्ला

ब्रोकरेज फर्म CLSAने विप्रोला Underperform बदलून Outperform रेटिंग दिले आहे. खरेदी करण्यासाठी 650 रुपये प्रति शेअरचे लक्ष्य देण्यात आले आहे. ब्रोकरेज कंपनीच्या मते विप्रोमध्ये पैसे गुंतवणूक करून 13 टक्क्यांचा चांगला परतावा मिळवता येईल.

विप्रोमध्ये गुंतवणूक का 

विप्रोमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देण्यामागे अनेक कारणे आहेत. कंपनी चांगली मार्केट स्ट्रॅटर्जी, क्लाइंट मॅनेजमेंट आणि योग्य नियोजनाच्या आधारावर मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे.

येणाऱ्या काळात कंपनीच्या प्रगतीसाठी अनेक सकारात्मक संकेत दिसत आहेत. कंपनीत मोठ्या प्रमाणात फ्रेशर हायरिंग झाल्याने मार्जिन सुधारणार आहे.

एक्सपर्ट्सचा सल्ला

या शेअरमध्ये गुंतवणूकीसाठी शॉर्टटर्मसाठी 590 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

तर लॉंगटर्म साठी 670 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच 550 रुपयांचा स्टॉप लॉस निश्चित करण्यात आला आहे.