Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? डिसेंबर 2023 मध्ये आस्मानी कहर अन्...

Baba Vanga Predictions: बाबा वांगा यांनी 2023 या वर्षासाठी अनेक भाकिते केली आहेत, ज्या अनेक गोष्टी खऱ्या ठरत आहेत. आता डिसेंबरमध्ये त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी होणार का?

Updated: Jun 8, 2023, 01:15 AM IST
Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? डिसेंबर 2023 मध्ये आस्मानी कहर अन्... title=
Baba Venga Prediction 2023

Baba Vanga Predictions: भविष्यवेत्ते बाबा वेंगा (Baba Vanga) यांचं नाव तुम्ही कुठं ना कुठं ऐकलं असेल. अचूक आणि अचूक भाकीत करणाऱ्या बाबा वेंगा यांचं म्हणणं खरं ठरतं, असा दावा केला जातो. बाबा वेंगा यांनी 9/11 चं अचूक भाकीत केलं होतं आणि संपूर्ण अमेरिका हादरली होती. त्यामुळे बाबा वेंगा यांच्या भाकितांची नेहमी चर्चा असते. अशातच आता बाबा वेंगा (Baba Vanga Bhavishyawani) यांनी केलेल्या भाकितांमुळे सर्वांचं टेन्शन वाढलं आहे.

2023 मध्ये हवामान, भूकंप, वादळ यामुळे लोकांना विनाशाचा सामना करावा लागू शकतो, असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं होतं. त्याचबरोबर 2023 वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबरमध्ये अणु हल्ला होईल, ज्यामुळे पृथ्वीवर भयंकर विनाश होईल, असंही त्यांनी म्हटलं होतं. बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीला तिसरं महायुद्ध असं नाव देण्यात आलं आहे. बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पात स्फोटाचा इशारा दिला होता. या अणुस्फोटातून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळे सर्वत्र कहर होईल, असंही वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता सर्वांचं टेन्शन वाढल्याचं दिसून येतंय. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी होणार का? असा सवाल आता विचारला जातोय.

बाबा वेंगा यांचं जन्म 1911 साली झाला होता. ते युरोपातील बल्गेरिया येथे राहत होते. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. मात्र, त्यांनी डोळ्यांच्या बदल्यात भविष्य पाहण्याची कला अवगत केली असं म्हणतात. बाबा वेंगा यांचे ऑगस्ट 1996 मध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी सन 5079 पर्यंत भविष्यवाणी (Baba Vanga Future Predictions) केली होती.

2022 या वर्षासाठी बाबा वनगा यांनी 6 भाकिते केली होती. त्यापैकी 3 खऱ्या ठरल्याचं दिसून आलं होतं. बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये काही आशियाई देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये पूर येण्याची भविष्यवाणी केली होती जी खरी ठरली आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात पावसानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक लोकांचा मृत्यू देखील झाला होता.

आणखी वाचा - Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

दरम्यान, 2022 मध्ये पाकिस्तानमध्येही पुरामुळे परिस्थिती बिकट झाली होती. याचदरम्यान 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय बाबा वेंगा यांनी काही शहरांमध्ये पाणीटंचाई आणि दुष्काळाचीही भविष्यवाणी केली होती. मागील वर्षाच्या अखेरीस पोर्तुगालला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं तर इटलीमध्ये दुष्काळाची समस्या उघड झाली होती.