मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railways) हे जगातील चौथे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. एवढे मोठे रेल्वे नेटवर्क ऑपरेट करण्यासाठी अनेक चिन्ह आणि सिग्नल्सचा वापर केला जातो. ज्यामुळे ही रेल्वे सेवा कोणत्याही बाधां शिवाय आपल्या प्रवाशांना उत्तम सोय देते.
जर हे चिन्हं किंवा सिम्बॉल्स नसतील तर, भारतातच काय तर, कोणत्याही देशात रेल्वे चालवणे शक्य होणार नाही.
भारतीय रेल्वेमध्ये वापरले जाणारे बहुतेक चिन्हे किंवा सिम्बॉल्स हे रेल्वे कर्मचार्यांसाठी असतात. याशिवाय भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील काही चिन्हे आणि सिम्बॉल्स देण्यात आले आहेत. यांपैकी, भारतीय रेल्वेच्या डब्यांवर असलेल्या महत्वाच्या चिन्हाची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही माहिती प्रत्येक प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
तुम्ही स्टेशनवर येणाऱ्या अनेक गाड्यांच्या डब्यांवर पांढर्या किंवा पिवळ्या रंगाच्या पट्ट्या पाहिल्या असतील. या पट्ट्या एका डब्याच्या शेवटी टॉयलेट विंडोवर बनवल्या जातात. या पट्ट्या अगदी साध्या आहेत, परंतु त्यांचे स्वतःचे एक महत्त्व आहे आणि ते रेल्वे प्रवाश्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. बर्याच वेळा रेल्वेच्या फलाटावर हजारो प्रवाशांची गर्दी जमते. या गर्दीतील काही लोकं एसी बोग्यांमध्ये प्रवास करणारे असतात, तर काही लोकं स्लीपर बोग्यांमध्ये जात आहेत. या व्यतिरिक्त बरेच प्रवासी द्वितीय श्रेणीच्या बोग्यांमधूनही प्रवास करतात.
कोणत्याही ट्रेनमध्ये स्लीपर कोचपेक्षा जनरल बोग्यांची संख्या खूपच कमी असते. त्यामुऴे प्रवाशांना रेल्वेचे जनरल बोगी सहज शोधता यावे यासाठी या पट्ट्या बनवल्या आहेत. जनरल बोग्यांमधून प्रवास करणार्या प्रवाशांना डब्याच्या शेवटी पांढर्या आणि पिवळ्या रंगाची पट्टी पाहिल्यानंतर समजते की, त्यांना या डब्यात बसायचे आहे.
रेल्वेमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जनरल डब्बा कुठे येतो हे माहिती असते. परंतु काहीवेळा डब्यांच्या क्रमात बदल होतो, ज्यामुळे प्रवाशांना डब्बा ओळखने कठीण होते. अशावेळी प्रवाशांना या पट्ट्या डब्याची ओळख करुन देण्यास मदत करतात.