मुंबई : देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटे दरम्यान, तुरुणांना जास्त धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (ICMR)स्पष्ट केले आहे. आयसीएमआरच्या प्रमुखांनी असे सांगितले आहे, अनेकवेळी तरुण घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहेत.
आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलाराम भार्गव ( Dr. Balaram Bhargava) म्हणाले की कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या डेटाची तुलना केल्यास हे दिसून येते की वयामध्ये फारसा फरक नाही. ते म्हणाले की 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक प्रतिकूल प्रभावांना बळी पडतात.
ते म्हणाले, 'आम्हाला असे आढळले आहे की, तरुण जास्त संक्रमित होत आहेत. कारण ते बाहेर गेले आहेत आणि देशात कोरोना विषाणूचे आधीच काही प्रकार अस्तित्त्वात आहेत, ते त्यांना संक्रमित करत आहेत. याशिवाय देशात सध्या अस्तित्त्वात असलेल्या सार्स-सीओव्ही -2 च्या काही प्रकारांमुळे धोका देखील आहे.
कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या दुसर्या लाटेला भारत तोंड देत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी मोठ्या संख्येने तरुण बळी पडत आहेत. संक्रमित लोकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे लोकांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शनची कमतरताही भासू लागली आहे.
दुसरीकडे, सरकारने मंगळवारी म्हटले आहे की कोरोनाव्हायरस आणि मृत्यूच्या आकडेवारीच्या दैनंदिन प्रकरणांमध्ये देशात प्राथमिक घट दिसून येत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा आदी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. कोविड -19 संसर्गाची रोजची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत.
तथापि, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पंजाब अशा 16 राज्यांत दररोज कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. यामुळे, सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाव्हायरस (Coronavirus)नियमांचे पालन करण्याबाबत सतत लोकांना सरकाकडून आवाहन करण्यात येत आहे.