Chandrayaan-3 Update: भारताचे चांद्रयान ३ चंद्राकडे झेपावले आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान -३ चंद्रावर सॉफ्ट लँडिग केले आहे. तर, एकीकडे रशियाचे लूना-25 हे यानदेखील चंद्रावर लँड होणार होते. मात्र, तांत्रिक कारणामुळं हे यान क्रॅश झाले. भारताचे चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र, आत्तापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एकही यान उतरले नाहीये. त्यामुळं हा टप्पा आव्हानात्मक होता..
रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी यशस्वी चंद्र मोहिमा केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या यानाच तिथे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलेय. पण दक्षिण ध्रुवावर अजूनपर्यंत कोणत्याही देशाने यान उतरवले नाहीये. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक रहस्य आहेत. याचा शोध घेण्याचे लक्ष्य दोन्ही देशांचे आहे. दक्षिण ध्रुवावरील काही भागांत एकदम अंधार तर काही ठिकाणी प्रकाश आहे. तर त्याच्याच जवळ पाणी आणि सूर्यप्रकाश देखील असण्याची शक्यता आहे. नासाने केलेल्या दाव्यानुसार, चंद्राच्या दक्षिण धुव्रावर असलेल्या खड्ड्यांमध्ये काही अरबो वर्षांपर्यंत सुर्याची किरणे पोहोचली नाहीयेत. या जागेचे तापमान -203 अंश असू शकते.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण ध्रुवावर बर्फ आणि पाणी असण्याची शक्यता आहे. जर चंद्रावर बर्फ आढळला तर ते अंतराळातील सोनं ठरु शकते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जर चंद्रावर बर्फ असेल तर पिण्याच्या पाण्यासाठी उत्खनन केले जाऊ शकते. त्याचबरोबर मानवाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन आणि रॉकेट फ्यूलसाठी हायड्रोजनमध्येही वापर केला जाऊ शकतो. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे इंधन केवळ पारंपारिक अवकाशयानासाठीच नव्हे, तर वेगवेगळ्या कामांसाठी अवकाशात पाठवल्या जाणाऱ्या हजारो उपग्रहांसाठीही वापरले जाईल.
चंद्रावर पहिले रोबोट लँडिंग होऊन 60 वर्षे झाली आहेत. पण अजूनही चंद्रावर उतरणे अजूनही अवघड काम आहे. आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या सर्व मोहिमांच्या यशाचा दर खूपच कमी आहे. येथे लँडिंग करण्यात अर्ध्या मोहिमाही अयशस्वी झाल्या आहेत.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा खूप कमी आहे. गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या फक्त एक षष्ठांश इतके आहे. यामुळे, अंतराळात यानाच्या लँडिंगच्या वेळी, त्याचा वेग कमी करण्यासाठी ड्रॅग उपलब्ध नाही. तसेच, चंद्रावर कोणत्याही यानाला त्याच्या लँडिंग साइटवर मार्गदर्शन करण्यासाठी जीपीएससारखी कोणतेही तंत्रज्ञान नाही. अंतराळवीरांना 239,000 मैल दूरवरून या कमतरतांची भरपाई करावी लागते. यामुळे देखील दक्षिण ध्रुवावर उतरणे हे खूप आव्हानात्मक काम आहे.
चंद्रावर असलेली मौल्यवान संसाधने भारतापासून रशियापर्यंत प्रत्येक देशाच्या हिताचा विषय आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणण्यानुसार, रॉकेटमध्ये भरण्यात येणारे अधिक किंमतीचे इंधन भरले नाही तर त्यामुळे येणाऱ्या काळात अंतराळ प्रवासाच्या खर्चात मोठी कपात होऊ शकते. याचा अर्थ असाही होतो की चंद्र एखाद्या वैश्विक गॅस स्टेशनप्रमाणे झाला असावा. भूवैज्ञानिक आणि खाण फर्म वॅट्स, ग्रिफिसच्या मते, पुढील 30 वर्षांत केवळ चंद्रावर आढळणारे पाणी 206 अब्ज डॉलर्सचा उद्योग बनू शकेल.