Why Do Tears Start Coming Out While Crying: जर तुम्हाला कोणी सांगितलं की रडण्याचे देखील फायदे आहेत. तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती दुःखी किंवा जास्त आनंदी होते, तेव्हा डोळ्यातून अश्रू निघतात. पण डोळ्यातून अश्रू येण्यामागचं कारण माहिती आहे का? अश्रू केवळ दुःखाच्या, संकटाच्या किंवा अति आनंदाच्या प्रसंगी येतात असं नाही तर ते एखाद्या विशिष्ट वासामुळे किंवा चेहऱ्यावर जोराचा वारा लागल्यानेही येतात. डोळ्यात पाणी येण्याचं कारण पूर्णपणे शास्त्रीय आहे. कांदा कापताना अश्रू येणे सामान्य आहे. अश्रूंचा संबंध आपल्या मूडशी असतो.
शास्त्रज्ञांनी मुख्यतः अश्रूंची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. पहिले गैर-भावनिक अश्रू असून डोळ्यांना कोरडे होण्यापासून वाचवतात आणि निरोगी ठेवतात. दुस-या श्रेणीमध्ये गैर-भावनिक अश्रू असतात. यात विशिष्ट गंधाच्या प्रतिक्रियेतून अश्रू येतात. जसं की कांदा किंवा फिनाईलसारख्या तीव्र वासामुळे अश्रू येतात. तिसऱ्या श्रेणीत भावनिक झाल्यावर म्हणजेच दु:ख किंवा अति आनंद झाली की अश्रू येतात.
मानवी मेंदूमध्ये एक लिंबिक सिस्टम असते, ज्यामध्ये मेंदूचा हायपोथालेमस असतो. हा भाग मज्जासंस्थेच्या थेट संपर्कात असतो. या प्रणालीचा न्यूरोट्रांसमीटर सिग्नल देतो आणि आपण एखाद्या भावनेच्या टोकाला जाऊन रडतो. माणूस फक्त दु:खानेच नाही तर रागाने किंवा भीतीनेही रडू लागतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात.
कांदा कापला तर अश्रू येतात
डोळ्यात पाणी येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कांद्यामध्ये असलेले रसायन. याला सिन-प्रोपॅन्थाइल-एस-ऑक्साइड म्हणतात. कांदा कापल्यावर त्यात असलेले हे रसायन डोळ्यातील अश्रू ग्रंथीला उत्तेजित करते, त्यामुळे डोळ्यातून अश्रू येऊ लागतात.
रडण्याचे फायदे आहेत
रडण्याचे फायदे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. थोड्या वेळासाठी रडणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही तणावापासून मुक्त होऊ शकता आणि चांगले अनुभवू शकता.