नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी तुरुंगात होता. शनिवारी आर्यनची जामीनावर सुटका करण्यात आली. अशातच ऑल इंड़िया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन औवेसीने आर्यन खान प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
औवेसीने म्हटले की, ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्या मुलाला जामीन मिळतो. महाराष्ट्रात दलित आणि मुसलमानांच्या विरोधात ट्रायल्स सुरू आहेत. त्याच्याविरोधात कोण बोलणार? मला या श्रीमंतांशी घेणं-देणं नाही, परंतु श्रीमंत असेल तरच न्याय मिळतो का? असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी उपस्थित केला आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 26 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला. तुरुंग प्रशासनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आर्यन तुरुंगामधून बाहेर आला आहे. आर्यन जेलमधून घरी आणण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला होता.