हैदराबादमध्ये महापौरपदासाठी कोणाची नावं चर्चेत?

हैदराबाद कोणाचा महापौर होणार?

Updated: Dec 5, 2020, 08:39 PM IST
हैदराबादमध्ये महापौरपदासाठी कोणाची नावं चर्चेत? title=

हैदराबाद : तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस हा हैदराबाद महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण आपला महापौर बसवण्यासाठी त्यांना इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. शनिवारी 150 जागांचा निकाल जाहीर झाला. ज्यामध्ये टीआरएसला 55 जागा मिळाल्या.

ओवैसी यांच्या पक्षाला 44 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने 48 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे एमआयएम हा पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहे. भाजपमुळे टीआरएसला मोठा झटका लागला आहे. आगामी 2023 निवडणुकीसाठी टीआरएसला भाजपकडून तगडं आव्हान मिळू शकतं. त्यामुळे टीआरएस भाजपची मदत घेण्याची शक्यता कमी आहे.

हैदराबादच्या महापौरपदाच्या शर्यतीत टीआरएसच्या मन्ने गोवर्धन रेड्डी यांची पत्नी आणि वेंकटेश्वर कॉलनीच्या नगरसेविका कविता रेड्डी, माजी आमदार चिंतल कनका रेड्डी यांची सून विजया शांती, खासदार केशव राव यांची मुलगी विजया लक्ष्मी आणि खैराताबादच्या नगरसेविका विजया रेड्डी यांचं नाव चर्चेत आहे. महापौर बोंतु राममोहन यांची पत्नी श्रीदेवी यांच्या नावाची ही चर्चा आहे.