त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदासाठी पाहा कोणाच्या नावाची चर्चा?

त्रिपुरामध्ये २५ वर्षानंतर लाल सरकारला सुरुंग लावत भगवं सरकार सत्तेत येत आहे. भाजपने सीपीएमला जोरदार धक्का देत त्रिपुराची सत्ता मिळवली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 5, 2018, 03:14 PM IST
त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदासाठी पाहा कोणाच्या नावाची चर्चा? title=

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये २५ वर्षानंतर लाल सरकारला सुरुंग लावत भगवं सरकार सत्तेत येत आहे. भाजपने सीपीएमला जोरदार धक्का देत त्रिपुराची सत्ता मिळवली आहे.

८ मार्चला शपथविधी सोहळा

८ मार्चला त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा रंगणार आहे. ६ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा आणि भाजपचे इतर राज्यांचे सर्व मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

६ मार्चला होणार घोषणा

त्रिपुरामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यासाठी नितीन गडकरी आणि जुएल ओराओ मंगळवारी ६ मार्चला आगरताळा येथे जाणार आहेत. सर्व आमदारांची बैठक येथे होणार आहे. त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्ष विप्लव देव यांची भाजप आमदारांच्या बैठकीत गटनेता म्हणून निवड करण्यात येणार आहे.

कोण होणार मुख्यमंत्री?

विप्लव देव यांनी त्रिपुरा यूनिवर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नाही. बनमालीपूरमध्ये विप्लव देव यांचा सामना ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या कुहेली दास यांच्यासोबत होता. विप्लव यांनी अर्ज दाखल करतांना त्यांची संपत्ती 2,99,290 रुपये इतकी सांगितली होती.

विप्लव कुमार अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघांची जोडलेले आहेत. राजकारणात प्रवेश त्यांनी आरएसएसशी जुडल्यानंतरच केली. ४८ वर्षांचे विप्लव देव यांनी २०१८ मध्ये पहिली निवडणूक लढवली होती.