कुठे आहे तबलिगी जमातचा मौलाना साद?

पोलिसांकडून चौकशीसाठी प्रश्नावली

Updated: Apr 6, 2020, 11:27 AM IST
कुठे आहे तबलिगी जमातचा मौलाना साद? title=

प्रतिनिधी, दिल्ली : निजामुद्दीनमध्ये मरकज या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या तबलिगी जमातचा मौलाना साद याच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं २६ प्रश्नांची प्रश्नावली बनवून मौलाना साद याच्या घरी पाठवली आहे. या प्रश्नावलीमध्ये मरकजबाबत माहिती मागवण्यात आली असून या धार्मिक कार्यक्रमाला किती लोक आले होतेयापासून ते मरकजचं आयोजन कशा प्रकारे होत होतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मागवण्यात आली आहेत.

कुठे आहे मौलाना साद

मौलाना साद याचा पोलीस शोध घेत असले तरी तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी घरी नोटीस दिल्यानंतर मौलाना साद यानं त्याच्या अनुयायांमार्फत निरोप पाठवून सांगितलं की, त्यानं स्वतःला सेल्फ क्वारंटाईन केलं आहे आणि जेव्हा मरकज सुरु होईल तेव्हा तो पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देईल.

पोलिसांची गुन्हे शाखा मौलाना साद याचा शोध दिल्लीपासून मेरठ, मुजफ्फरनगरपर्यंत घेत आहे. पोलिसांनी मौलानाविरोधात जी नोटीस पाठवली आहे त्यात २६ पैकी १५ महत्वाचे प्रश्न आहेत ते जाणून घेऊयात.

  1. १ जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत मरकजमध्ये किती लोक सहभागी झाले होते? 
  2. मरकजच्या जागेचा संपूर्ण नकाशा आणि साईट प्लान काय आहे? 
  3. मरकजमध्ये सीसीटीव्ही असेल तर कॅमेरे कुठे-कुठे लावले आहेत? 
  4. मरकजसाठी प्रशासनाची परवानगी होती तर त्याचे पुरावे काय आहेत? 
  5. मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफीत आहे का? 
  6. १२ मार्चनंतर मरकजमध्ये सहभागी झालेल्या परदेशी लोकांची नावं आणि पत्ते? 
  7. १२ मार्चनंतर सहभागी झालेल्या सर्व लोकांचं रजिस्टर कुठे आहे? 
  8. मरकजमध्ये सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती आजारी पडली असेल तर त्याचा तपशील आहे का? 
  9. १२ मार्चनंतर मरकजमधून लोकांना बाहेर पाठवण्यासाठी काय केलं गेलं? 
  10. लॉकडाऊननंतर मरकजमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी काय केलं गेलं? 
  11. १२ मार्चनंतर मरकजमधून हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची यादी कुठे आहे? 
  12. १२ मार्चनंतर क्वारंटाईन करण्यासाठी मशिद किंवा गेस्ट हाऊसमध्ये कोणत्या लोकांना पाठवलं गेलं? 
  13. मरकजमध्ये सहभागी ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांची सर्व माहिती काय आहे? 
  14. मरकजमधील कोणत्याही व्यक्तीला कर्फ्यू पास दिला असेल तर त्याचा तपशील काय आहे? 
  15.  १२ मार्चनंतर मरकजमध्ये मनपा अधिकाऱ्यांनी कधी-कधी दौरा केला? 

<p><iframe allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560"></iframe></p>