8th Pay Commission latest news: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळत आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळणार आहे. आठव्या वेतन आयोगाची मागणी आता जोर धरू लागली आहे. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. वास्तविक, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार असून, त्यामुळे जवळपास सर्व भत्ते वाढणार आहेत.
कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील
सध्या, सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. तर कमाल मूळ वेतन 56,900 आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारे, सुधारित मूळ वेतन जुन्या मूळ वेतनावरून मोजले जाते. वेतन आयोगाच्या अहवालात फिटमेंट फॅक्टर ही महत्त्वाची शिफारस आहे.
बेसिक फिटमेंट फॅक्टर
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आला होता. या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली. आकडेवारीवर नजर टाकली तर सर्वात कमी पगारवाढ सातव्या वेतन आयोगात मिळाली होती. मात्र, मूळ वेतन 18000 रुपये करण्यात आले होते. आता आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. कोणत्या वेतन आयोगात किती पगारवाढ झाली ते पाहू.
चौथा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
पाचवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
सहावा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
सातवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
आठवा वेतन आयोग कधी येणार?
आता आठवा वेतन आयोग कधी येणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. याबाबत तज्ज्ञांचे वेगवेगळे तर्क आहेत. आठवा वेतन आयोग यायला अजून वेळ आहे. 2026 पूर्वी 2024 मध्येही निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार कर्मचारी मतदारांची रोष ओढवून घेणार नाही. त्यामुळे पुढील वेतन आयोग येणार आणि तो 1 जानेवारी 2026 पर्यंत लागू होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
युनियन सरकारला निवेदन देणार
सेंट्रल एम्प्लॉइज युनियनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पगारवाढीच्या मागण्यांबाबत युनियन लवकरच एक पत्रक तयार करून सरकारला सुपूर्द करणार आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास संघटनेला तीव्र आंदोलन करावे लागेल. या आंदोलनात कर्मचाऱ्यांसह पेन्शन मिळालेले कर्मचारीही सहभागी होणार आहेत.