मुंबई : कोरोना व्हायरसची दुसरी लाट देशात कहर करत आहेत. लोकं या विषाणूपासून बचावासाठी घराबाहेर पडत नाहीयेत. कोरोना व्हायरसमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे इतर आजारांचा धोका वाढत आहे. प्रतिकारशक्ती कमी होत आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांना शक्य तितक्या लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. जेणेकरुन भविष्यात ते स्वत:ला या आजारापासून वाचवू शकतील. कोरोनावर मात केल्यानंतर किती दिवसांनी लस घेतली पाहिजे असा अनेकांना प्रश्न पडला असेल. (Corona Vaccine)
कोरोनावर मात केल्यानंतर प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने ट्विटद्वारे म्हटलं आहे की, कोरोनावर मात केल्यानंतर 4 आठवड्यानंतर लस घेऊ शकतात.
How long should one wait to take #COVID19Vaccine after recovering from #COVID19 ❓❓
A recovered #COVID patient should wait for at least 4 weeks from recovery, before getting #vaccinated #IndiaFightsCorona #Unite2FightCorona pic.twitter.com/FHtduFQOnK
— PIB India (@PIB_India) May 19, 2021
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने अशी शिफारस केली आहे की, एखाद्या व्यक्तीला बरे झाल्यानंतर लगेचच लसीकरण करावे, तर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नमूद केले आहे की, त्या व्यक्तीने सहा महिने थांबावे, कारण मानवी शरीरात, नैसर्गिक प्रतिपिंडे कायम आहेत. भारतातील बहुतेक डॉक्टर सामान्यत: एक ते तीन महिन्यांच्या दरम्यान लसीकरणाची शिफारस करतात.
चार आठवड्यांनंतर लस का घ्यावी?
कोरोनामधून बरे झाल्यानंतर चार आठवड्यांनंतर लस घेतल्याने रोगप्रतिकारक सुधारेल. असे मानले जाते की कोविड झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात जे शरीरात 4-6 आठवड्यांपर्यंत राहू शकतात. कोरोनावर मात केल्यानंतर संसर्गाची प्रतिक्रिया शरीरात सुरुच राहते. म्हणून अशा वेळी लसीकरण करणे ही लसीचा अपव्यय ठरेल. शरीरात नैसर्गिक रोग प्रतिकारशक्तीची परवानगी दिली पाहिजे, तरच रोगप्रतिकारक प्रतिक्रिया आणखी वाढविण्यासाठी लस दिली पाहिजे.