मुंबई : कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश कुमार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काँग्रेस नेते रमेश कुमार यांनी कर्नाटक विधानसभेत बलात्कारावर केलेली टिप्पणी अतिशय धक्कदायक आहे. या वक्तव्यावरून चहुबाजुंनी टीका होत आहे.
विधानसभेत अध्यक्षांना संबोधित करताना रमेश कुमार म्हणाले की,'जर बलात्कार रोखणे कठीण असेल तर झोपा आणि त्याचा आनंद घ्या'. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस नेत्याने केलेल्या वक्तव्याला कुणीही विरोध केला नाही. एवढंच नव्हे तर या विधानावर विधानसभेत एकच हसा पिकला.
कर्नाटकात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे वेळ मागत होते. आमदारांच्या मागणीवर सभापती म्हणाले की, वेळेची कमतरता आहे.
A former speaker & the sitting speaker speaking about #rape in this manner on the floor of the house does not augur well. "When rape is inevitable you must lie down and enjoy," says #Rameshkumar for which @kageri250 laughs. #Karnataka #politics pic.twitter.com/N9ThNohBm6
— Chethan Kumar (@Chethan_Dash) December 16, 2021
प्रत्येकाला वेळ देत राहिलो तर हे सत्र कसे चालेल? काँग्रेस नेते रमेशकुमार यांच्याकडे पाहून तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल, असे त्यांनी आमदारांना सांगितले. ते जाऊ द्या, जसं सुरू आहे तसं सुरूच राहू दे. आणि परिस्थितीचा आनंद घ्या. मी सिस्टम नियंत्रित करू शकत नाही. माझी चिंता सभागृहाच्या कामकाजाबाबत आहे. हे पूर्ण करणे देखील आवश्यक आहे.
वक्त्याचे भाषण संपल्यावर काँग्रेस नेते रमेश कुमार त्यांच्या जागेवर उभे राहिले. उत्तर देताना म्हणाले की, एक म्हण आहे.. ‘जेव्हा बलात्कार थांबवणे अशक्य असते, तेव्हा झोपा आणि त्याचा आनंद घ्या. रमेश कुमार यांच्या विधानावर आक्षेप घेण्याऐवजी सभापती आणि सदस्य हसायला लागले.