जेव्हा आई मुलाला Long Drive वर नेते; इंटरनेटवर सुस्साट Viral होतोय हा Video

मेहनतीच्या बळावर त्यानं आईला एक अविस्मरणीय भेट दिली. ही भेट म्हणजे लक्झरी कार (Luxury Car).

Updated: Sep 15, 2022, 11:40 AM IST
 जेव्हा आई मुलाला Long Drive वर नेते; इंटरनेटवर सुस्साट Viral होतोय हा Video title=

Mother Viral Video: सोशल मीडिया (Social Media) हे असे प्लटफॅार्म आहे ज्यावर दिवसभरात लाखो व्हिडीओ शेअर केले जातात. त्यापैकी बरेचसे व्हिडीओ तुफान व्हायरलही होतात. असाच एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. हा Viral Video आहे एका मुलाचा आणि त्याच्या आईचा. 

आपण सगळेच जसे मोठे होऊ लागतो तसतसे पालकांनी आपल्यासाठी घेतलेली मेहनत आणि आपल्या आयुष्यातील त्यांचं योगदान या साऱ्याप्रती प्रेम आणि आदर वाढू लागतो. त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकळच आपण धडपड करू लागतो. त्यासाठी आपण मेहनत घेतो. 

त्यांना पावलोपावली आनंद मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असतो. एका तरुणानंही हेच केलं. मेहनतीच्या बळावर त्यानं आईला एक अविस्मरणीय भेट दिली. ही भेट म्हणजे लक्झरी कार (Luxury Car). लेकानं दिलेली ही भेट पाहताना आईच्या मनात असणाऱया भावना या व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. 

मुलाने दिली आईच्या हातात Mahindra XUV 700
सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक महिला लग्जरी कारच्या ड्रायव्हींग सीटवर बसलेल्या दिसत आहेत. त्यांच्या मागच्या सीटवर मुलगाही दिसत आहे. आपण काहीतरी वेगळं करतोय, या भावनेनं महिलेच्या मनात असणाऱ्या भावना चेहऱ्यावरील आनंदावाटे व्यक्त होत आहेत. 

लक्झरी कारचं (Luxury Car) स्टेअरिंग हाती आल्यानंतर ही आईच तिच्या मुलाला एका अविस्मरणीय लाँग ड्राईव्हवर घेऊन जाते. आईचं ड्रायविंह स्कील पाहून, नेटकरीही हैराण होत आहेत. भल्याभल्यांना लाजवेल इतल्या सुरेखपणे त्या ही कार चालवताना दिसत आहेत. तुम्ही पाहिला का हा Best Video?