सिंहिणीची शिकार पळवण्याचा तो प्रयत्न करतो खरा, पण... पुढे काय घडतं एकदा पाहाच

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंहिणीने एका प्राण्याची शिकार केली आहे

Updated: Mar 17, 2022, 04:22 PM IST
सिंहिणीची शिकार पळवण्याचा तो प्रयत्न करतो खरा, पण...  पुढे काय घडतं एकदा पाहाच title=

मुंबई : आपल्याला सोशल मीडीयावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. तुम्हाला अगणीत असे येथे व्हिडीओ पाहायला मिळतात, त्यामुळे हे व्हिडीओ पाहाता पाहाता वेळ कसा निघून जातो हे आपलं आपल्याला कळत नाही. येथे तुम्हाला तुमच्या आवडीचे म्हणजे, सायन्स, क्राफ्ट, लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात आता एक वाईल्ड लाईफ व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिल.

आपल्याला तर हे माहित आहे की, सिंह हा जंगलाचा राजा आहे आहे. त्यामुळे त्याच्या समोर कोणताही प्राणी येण्याची हिंमत करता येत नाही. परंतु तरसने या सिंहासमोर येण्याची हिंमत केली. त्याने नुसतीच हिंमत केली नाही, तर चक्क सिंहिणीच्या तोंडातून अन्न पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंहिणीने एका प्राण्याची शिकार केली आहे आणि ती त्याला खात आहे. परंतु तेवढ्यात तेथे एक तरस येतो आणि तो सिंहिणीच्या तोंडातील भक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु सिंहिण मात्र ते सोडतच नाही आणि ते भक्ष आणखी जोरात खेचते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ पाहूण सगळ्यांनाच भिती वाटते की आता पुढे काय होईल. परंतु हा व्हिडीओ तेव्हाच संपतो.

हा व्हिडीओ wildmaofficial या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला अगदी काही वेळातच व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहेत.