Rahul Gandhi : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेमुळे (bharat jodo yatra) चर्चेत आहेत. यावेळी राहुल गांधी हे विविध राज्यातील लोकांना भेटत त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. लोकही राहुल गांधी यांच्यासोबत मुक्तपणे संवाद साधत आहेत. दरम्यान, या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी दिलेल्या एका प्रश्नाचे उत्तर सध्या फारच चर्चेत आहेत. एका मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाबाबत (Rahul Gandhi Marriage) भाष्य केले आहे. 52 वर्षीय राहुल गांधी यांनी त्यांना आयुष्यात कसा जोडीदार हवाय याबाबत दिलखुलासपणे भाष्य केले आहे.
एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी त्यांना लाइफ पार्टनर म्हणून कशी मुलगी हवी आहे याबाबत आपलं मत स्पष्ट केले आहे. 'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की, त्यांना अशा व्यक्तीला आपला जोडीदार बनवायला आवडेल, ज्यामध्ये त्यांची आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी या दोघांचेही गुण असतील.
राहुल गांधी यांना कशी पत्नी हवीय?
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत ते माझ्या आयुष्यातील प्रेम आहे आणि माझी दुसरी आईसुद्धा असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांना तुम्हाला आयुष्याचा जोडीदार म्हणून त्यांचासारखी व्यक्ती चालेल का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी, "हा खूपच चांगला प्रश्न आहे. त्यांच्याच खूप चांगले गुण आहेत. मला त्यांच्यासारख्या गुणांची स्त्री आवडेल. तिच्याच माझ्या आई आणि आजीच्या गुणांची सांगड चांगली असली तरी माझी हरकत नाही," असे म्हटले.
राहुल गांधी यांना पप्पू म्हटल्याचे वाईट वाटतं का?
मला कोणी पप्पू म्हणतो तेव्हा वाईट वाटत नाही कारण हा सगळा प्रचाराचा भाग आहे आणि जे असे बोलतात ते स्वतःच त्रस्त आणि घाबरलेले असतात, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. "हा प्रचाराचा भाग आहे. जे बोलत आहेत त्यांच्या आत भीती आहे. त्यांच्या आयुष्यात काहीच नाही. जर त्यांना मला शिवीगाळ करायची असेल तर त्यांनी मला शिव्या द्याव्यात, मी त्याचे स्वागत करेन. मी कोणाचाही द्वेष करत नाही. तू मला शिव्या दिल्यास तरी मी तुझा तिरस्कार करणार नाही," असे राहुल गांधी यांनी म्हणाले.
मला गाड्यांमध्ये रस नाही - राहुल गांधी
"माझ्याकडे कार नाही, फक्त माझ्या आईची एक CR-V आहे. मला गाड्यांमध्ये रस नाही पण बाईकमध्ये आहे. मी कार दुरुस्त करू शकतो पण मला कारची आवड नाही. मला वेगात धावणे, हवेत धावणे, पाण्यात धावणे आणि जमिनीवर फिरणे आवडते," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.