बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. जमावाने घरं, कार्यलये पेटवली असून सध्या तिथे तणावाचे वातावरण आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देशातून पळ काढला आहे. तर, त्यांच्या पक्षातील अनेक मंत्र्यांनीही देश सोडण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या प्रमाणात बांगलादेशात अराजकता माजली आहे. हिंदू मंदिरावरदेखील हल्ले होत आहेत. हिंसाचार उफाळलेल्या बांगलादेशातील स्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. अशावेळी संपूर्ण जगभरात बांगलादेशचीच चर्चा सुरू आहे. अशावेळी सध्या गुगलवर बांगलादेशबद्दल अनेक प्रश्न सर्च केले जात आहेत. जाणून घेऊया बांगलादेशसंदर्भातील काही प्रश्नांची उत्तरे
बांगलादेशातील परिस्थिती चिघळल्यानंतर सध्या जगभरात नेमकं काय घडलं या प्रश्न चर्चेत असताना या देशाविषयी अधिक माहिती जाणून घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून सुरु झालेल्या या हिंसाचारात आता संपूर्ण देश जळत आहे.जे लोक सरकारी नोकरीसाठी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी हे प्रश्न नक्कीच उपयोगी ठरतील.
1) बांगलादेशचे जुने नाव काय होते?
स्वातंत्र्यपूर्व काळात बांग्लादेश हा भारताचा हिस्सा होता. तेव्हा त्याला पूर्व बंगाल म्हटलं जात होते. फाळणीनंतर हा हिस्सा पाकिस्तानच्या वाटेला गेला. तेव्हा त्याला पूर्व पाकिस्तान म्हटलं जातं होतं. पुढे 1971 मध्ये पाकिस्तानपासून स्वांतत्र्य मिळाल्यानंतर या देशाला बांग्लादेश म्हटलं जातं.
2) बांगलादेशचे अधिकृत नाव काय?
बांगलादेशचे अधिकृत नाव पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेश असं आहे.
3) बांगलादेशमध्ये एक व्यक्ती कितीकाळ राष्ट्रपतीपदावर राहू शकते?
बांग्लादेश येथे नियम आहे की, एक व्यक्ती दोनपेक्षा जास्त काळ राष्ट्रपतीपदावर राहू शकत नाही. दर पाच वर्षांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होतात.
4) बांगलादेशचे राष्ट्रीय फळ काय आहे?
बांगलादेशचे राष्ट्रीय फळ फणस असून राष्ट्रीय वृक्ष आंबा आहे. तर, राष्ट्रीय फुल लीली आहे.
5) बांगलादेशला स्वातंत्र्य कधी मिळाले?
26 मार्च 1971 साली बांगलादेशने स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली होती. खरं तर 16 डिसेंबर 1971 सालीच देशाचा स्वातंत्र्य मिळालं होतं. तर, 4 नोव्हेंबर 1972 साली संविधान लागू करण्यात आले.
6) बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ कोणता?
बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ कबड्डी आहे.
7) बांगलादेशचे राष्ट्रगीत कोणी लिहले?
बांगलादेशचे राष्ट्रगीत रविंद्रनाथ टागोर यांनी लिहलं असून त्याची सुरुवात अमर सोनार बांग्ला अशी आहे.
8) बांगलादेशचे सर्वात मोठे शहर कोणते?
बांगलादेशचा सगळ्यात मोठे शहर राजधानी ढाका असून तेथे लोकसंख्येच्या तुलनेत जगातील दहावं मोठं शहर आहे.
9) सगळ्यात मोठा समुद्र किनारा
बांगलादेशला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभला आहे. जगातील सर्वात मोठा समुद्र किनारा असून येथील कॉक्स बाजार बीच जगप्रसिद्ध आहे.
10) बांगलादेशचा राष्ट्रीय प्राणी कोण?
बांगलादेशचा राष्ट्रीय प्राणी रॉयल बंगाल टायगर आहे.