Warranty आणि Guarantee मध्ये नेमक काय आहे फरक? जाणून घ्या संपूर्ण माहिती

 या वॉरंटीचा किंवा गॅरंटीचा लाभ कसा घ्यावा, हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

Updated: May 12, 2022, 05:50 PM IST
Warranty आणि Guarantee मध्ये नेमक काय आहे फरक? जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : आपण कधीही दुकानातून एखादी वस्तु खरेदी करतो तेव्हा त्याच्या वारंटी किंवा गॅरेंटीबद्दल आपण त्यांना विचारतो. दुकानवाले देखील आपल्या 1 वर्ष किंवा 2 वर्षांची हमी आपल्याला देतात. परंतु असे बरेच लोक आहेत. ज्यांना वारंटी किंवा गॅरेंटीमधील फरक माहित नाही. बऱ्याच लोकांना दोन्हीही गोष्टी सारख्याच वाटतात, ज्यामुळे त्यांच्या मनात चुकीची समजुत तयार होते. परंतु आम्ही तुम्हाला आज या दोन गोष्टींबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

गॅरंटी म्हणजे काय?

सर्व प्रथम, आपण गॅरंटी म्हणजे काय ते जाणून घेऊया. गॅरंटी म्हणजे कंपनी आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेची संपूर्ण जबाबदारी घेते. जर त्यात लहान दोष असेल, तर ती तिच्या मेकॅनिकला ती दुरुस्त करण्यासाठी पाठवते, तर जेव्हा एखादी मोठी चूक आढळली तेव्हा ती तिचे उत्पादन परत घेते.

मग वॉरंटीचा अर्थ काय?

त्याच वेळी, वॉरंटी म्हणजे दोष लहान असो वा मोठा, कंपनी कोणत्याही परिस्थितीत आपले उत्पादन परत घेत नाही. त्याऐवजी, ती तिच्या मेकॅनिकला ते दुरुस्त करण्यासाठी आणि किरकोळ सुटे भाग स्थापित करण्यासाठी तुमच्या घरी पाठवू शकते.

उत्पादन पुन्हा घेतल्यानंतर कंपनीचे नुकसान अधिक होत असल्याने, आजकाल बहुतेक कंपन्या त्यांच्या उत्पादनावर गॅरंटी देण्याऐवजी वॉरंटी देतात आणि आपल्याला ग्राहक म्हणून या दोन्ही गोष्टींमधला फरक माहित नसतो, ज्यामुळे आपण देखील जास्त वितार न करता ते विकत घेतो.

शिवाय या वॉरंटीचा किंवा गॅरंटीचा लाभ कसा घ्यावा, हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी कराल तेव्हा त्याचे बिल निश्चितपणे घ्या. यासोबतच ते उत्पादन उघडल्यानंतर त्यावर दुकानदाराची सही आणि त्यात ठेवलेल्या गॅरंटी/वारंटी कार्डवर शिक्का घ्या. जेव्हा या दोन गोष्टी केल्या जातात तेव्हाच असे मानले जाते की, आपण ती वस्तू कायदेशीररित्या खरेदी केली आहे आणि त्यासाठी आवश्यक कर देखील भरला आहे.

या दोन कागदपत्रांशिवाय, मालाचे नुकसान झाल्यास तुम्ही गॅरंटी-वारंटीसाठी कंपनीकडे दावा करू शकत नाही.

वस्तू खरेदी करताना काय पहावे?

जेव्हाही तुम्ही बाजारात तुम्हाला आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा त्यावर लिहिलेली गॅरंटी किंवा वॉरंटीकडे नक्की लक्ष द्या. कोणत्या उत्पादनावर गॅरंटी-वॉरंटी सर्वात जास्त काळ लिहिली आहे ते पहा. ज्या मालावर दीर्घ मुदतीची गॅरंटी-वारंटी लिहिलेली असेल, तर त्याचा दर्जा चांगला असू शकतो आणि मधेच तो खराब झाला तरी त्यावर काही खर्च करावा लागणार नाही, हे समजून घ्या आणि स्मार्ट खरेदी करा.