नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये जोशीमठ इथे हिमकडा तुटल्यामुळे प्रचंड नुकसान झालंय. आयटीबीपीने आत्तापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. उत्तराखंडमध्ये रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. अद्याप इथून 125 मृतदेह बेपत्ता आहेत. तर 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. पर्यावरण तज्ञांनी या नैसर्गिक आपत्तीसाठी मानवी हस्तक्षेपास जबाबदार धरलंय.
ही एक दुर्देवी घटना आहे. ही घटना का घडली याची चौकशी झाली पाहीजे. पण हिमालय क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने परिस्थिती संवेदनशील झाल्याचे ग्रीनपीस इंडिया (Greenpeace India) के ज्येष्ठ जलवायु आणि ऊर्जा प्रचारक अविनाश चंचल (Avinash Chanchal) यांनी सांगितले. या घटनेमुळे आपण जलवायु परिवर्तनासंबंधी अधिक संवेदनशील बनू. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून आपण निर्माण कार्य करताना काळजी घ्यायला हवी असे ते म्हणाले.
दुर्घटनेची नेमकी व्याख्या आत्ताच सांगण खूप घाई होईल. हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगमुळे अशी घटना घडते. ही समस्या आता धोकादायक बनत चालली आहे. हिमालयीन प्रदेश हे सर्वात कमी देखरेखीचे क्षेत्र आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ नये म्हणून या भागांच्या देखरेखीसाठी अधिक स्त्रोत खर्च करण्याची गरज असल्याचे विशेषज्ञ अंजल प्रकाश यांनी सांगितले. या ठिकाणी जास्त करण्याची विनंती आम्ही करु. या क्षेत्रात होणाऱ्या बदलांची माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे आपण अधिक जागरुक असू आणि चांगल्या स्थिती निर्माण करु असेही ते म्हणाले.
हिमालय क्षेत्रात ग्लेशियर तुटणे ही दुर्मिळ घटना आहे. उपग्रह आणि गुगल अर्थ चित्रांमध्ये प्रदेशाजवळ कोणतेही हिमनदी तलाव दिसत नाही. हवामानातील बदलामुळे अनियमित वातावरण झालंय. हिमालयावर पाऊस आणि बर्फाचा मारा वाढलाय. जास्त हिवाळा नसल्याने बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळे हिमालयीन प्रदेशाच्या विकासाच्या मॉडेलवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे आयआयटी इंदौरचे सहाय्यक प्राध्यापक मोहम्मद फारुक यांनी सांगितले.
दरम्यान, पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय कर्णप्रयागमध्ये अलकनंदा नदी किनाऱ्यावरील घरे रिकामी करण्यात आली आहेत. ग्लेशियर तुटल्यामुळे (Uttarakhand Glacier Burst) ऋषीगंगा तपोवन हायड्रो प्रोजेक्टचा बांध फुटला आणि नदीतील पाण्याची पातळी वाढली. दरम्यान बोगद्यात पूर्ण शरीर अडकलेल्या मजुराने आपली कहाणी सांगितलीय. उत्तराखंड पोलिसांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन शेअर केलाय.
चमोलीत हिमनदी फुटल्यानंतर नद्यांना आलेल्या पूरातून आल्यानंतर आयटीबीपीने मदत आणि बचाव कार्य सुरु केलंय.
आयटीबीपी जवान अरुंद बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. आपण मानेपर्यंत बोगद्यात अडकले होतो असे सुटका झालेल्या व्यक्तीने सांगितले. "बोगद्याचा ढिगारा माझ्या मानेपर्यंत भरला होता, मी स्वत: सळी पकडून बाहेर आलोय. बोगद्यात तुम्हाला भीती वाटली नाही का ? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने काही उत्तर दिले नाही.
बचावकार्यात आयटीबीपी, एनडीआरएफ, सीडीआरएफ, आर्मी, एअरफोर्स टीम्स अविरत प्रयत्न काम करत आहेत. पाण्याचा प्रवाह ओसरल्यामुळे मदतकार्याला वेग आलाय. अजूनही १२५ जण बेपत्ता आहेत.
गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की एनडीआरएफची चार पथके (सुमारे 200 जवान) हवाईमार्गे डेहरादून पोहोचत आहेत तेथून ते जोशीमठला जातील. त्याचप्रमाणे आयटीबीपी आणि राज्य आपत्ती दलाचे कर्मचारी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रभावित ठिकाणी पोहोचले आहेत.
अपर जिलाधिकारी टिहरी शिव चरण द्विवेदी यांनी माहिती दिली की, धौली नदीला पूराची सूचना मिळताच अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरिद्वार जिल्हा प्रशासनाने येथे अलर्ट जारी केला आहे. ऋषिकेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदीतून बोटींग आणि राफ्टिंग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.