...जेव्हा 'तारिणी'समोर आला अवाढव्य व्हेल

'नाविका सागर परिक्रमा' उपक्रमा अंतर्गत नौदलाच्या महिला अधिकारी 'तारिणी'वर स्वार होऊन जगभ्रमंतीवर निघाल्यात. प्रवास करत करत तारिणी ही नौका हिंद महासागरात पोहचलीय. 

Updated: Sep 24, 2017, 04:30 PM IST
...जेव्हा 'तारिणी'समोर आला अवाढव्य व्हेल  title=

मुंबई : 'नाविका सागर परिक्रमा' उपक्रमा अंतर्गत नौदलाच्या महिला अधिकारी 'तारिणी'वर स्वार होऊन जगभ्रमंतीवर निघाल्यात. प्रवास करत करत तारिणी ही नौका हिंद महासागरात पोहचलीय. 

याच प्रवासा दरम्यान या सगळ्या महिलांना व्हेल माशाचं दर्शन घडलंय. तारिणी नौकेसमोर हा व्हेल मासा पाहायला मिळाला. ही सगळी दृष्यं कॅमे-यात कैद झाली आहेत.

आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. या नौकेने नौदलाच्या महिला अधिकारी जगप्रवासाला रवाना झाल्यात. भारतात महिला कर्मचाऱ्यांसह हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे.