'या' मुख्यमंत्र्यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन

 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) यांचे धाकटे बंधू आशिष बॅनर्जी यांचे आज निधन झाले.  

Updated: May 15, 2021, 12:15 PM IST
'या' मुख्यमंत्र्यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन title=
संग्रहित फोटो

 कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) यांचे धाकटे बंधू आशिष बॅनर्जी यांचे आज निधन झाले. (Ashim Banerjee's Death) त्यांच्या मृत्यूचे कारण कोरोना विषाणू (Coronavirus)असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (West Bengal CM Mamata Banerjee’s younger brother Ashim Banerjee dies of COVID-19)

 कुटूंब शोकाकुळ वातावरण 

सीएम ममता बॅनर्जी यांचे धाकटे बंधू ममता बॅनर्जी यांच्या भावाच्या निधनानंतर  (Mamata Banerjee's Brother Death) त्यांच्या घरात शोकाकुळ वातावरण आहे. रुग्णालयातून मृतदेह मिळाल्यानंतर त्यांच्यावर कोविड मार्गदर्शक तत्त्वांतर्गत  आशिम बॅनर्जी यांच्यात अंत्यसंस्कार (Last Rites Of Ashim Banerjee) करण्यात येणार आहेत.

West Bengal: CM Mamata Banerjee के छोटे भाई Ashim Banerjee का निधन, Covid-19 ने ले ली जान

कोरोनाचा उद्रेक कायम

कोरोनाचा उद्रेक कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे नवीन 3,26,098 रुग्ण आढळले, तर 3,890 लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला. तथापि, कोरोनाहूनही 3,53,299 रुग्ण बरे झाले.

भारतात कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण

 भारतात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 2,43,72,907 रुग्ण आढळले आहेत आणि 2,66,207 रुग्णांचा यात मृत्यू झाला आहे. कोरोनामध्ये सध्या देशात 36,73,802 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 18,04,57,579 लोकांना कोरोना ही लस दिली गेली आहे.