दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू, नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

दिल्ली सरकारचा महत्वाचा निर्णय

Updated: Jan 4, 2022, 03:24 PM IST
दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू, नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर title=

नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राष्ट्रीय राजधानीत संसर्गाचा वेग रोखण्यासाठी आज झालेल्या DDMA च्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजधानीत कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सोमवारी दिल्लीत 4099 नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या 7 महिन्यांतील कोरोना प्रकरणांची हि सर्वाधिक संख्या होती. त्याचप्रमाणे सफदरजंग हॉस्पिटल, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, आरएमएल, एम्स आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील सुमारे 59 डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

काल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोनाने गाठले. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वाची माहिती दिली. दिल्लीसह संपूर्ण देशात ओमायक्रॉनचा (Omicron) आलेख सातत्याने वाढत आहे. Omicron जास्त नुकसान करत नाही. सध्या संपूर्ण जगात जे चालू आहे तेच दिल्लीतही दिसत आहे.

आपण सर्वांनी कोविडपासून कोणत्याही परिस्थितीत दूर राहणे आवश्यक आहे. त्यामुळे DDMA च्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा वीकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत शनिवार आणि रविवारी संचारबंदी असेल.

हे घेतले निर्णय
- खासगी आणि सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती
- सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम सुरू राहील.
- अत्यावश्यक सेवांची कार्यालये सुरू राहतील.
- खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालतील