मुंबई : सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहात आहेत. दररोज कुठे ना कुठे लग्न हे सुरूच असतं. त्यामुळे आपल्या सोशल मीडियावर देखील लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. आधीच्या काळात लग्नाचे किस्से म्हटलं की, लोकं आठवण काढून सांगायचे आणि हे किस्से ऐकून आपल्याला हसू देखील येतात. परंतु आता असा काळ आला आहे की, लोकांना लग्नाचे काही रंजक किस्से कॅमेरामध्ये कैद करणे शक्य झाले आहे.
लोकं नुसतेच असे किस्से कॅमेरात कैद करत नाहीत, तर आता त्यांना सोशल मीडियावर देखील शेअर करतात, ज्यामुळे लग्नात उपस्थीत लोकांचे मनोरंजन तर होतेच पण त्याच बरोबर यूजर्सचे देखील मनोरंजन होते.
लोकं देखील या लग्नाच्या व्हिडीओंना आवर्जून पाहातात ज्यामुळे असा व्हिडीओंना खूप लाईक्स आणि शेअर देखील मिळतात. लग्नाचा असाच एक व्हिडीओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
लग्नामध्ये, कधीकधी वधू आणि वर अशी काही गोष्ट करतात ज्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येक लोक चर्चा करतात. आता या व्हिडीओचच बघा, यामध्ये वधू -वरांचा विनोद कसा सुरू आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू आणि वर हातात वरमाळा घेऊन उभे आहेत. जेव्हा वधू हार घालण्याचा प्रयत्न करते, तेव्हा नवरदेव देखील त्याच्या हातातील वरमाळा समोर आणतो आणि नववधूला हार घालण्यापासून रोखतो. नवरदेव नववधूसमोर असे दोन वेळा करतो तेव्हा नववधूला त्याचा खोडसाळपणा समजतो, तेव्हा ती नवरदेवाचा हात खाली करुन त्याला हार घालण्याचा प्रयत्न करते आणि नवरदेवाला इशाऱ्याने सांगते की, मी तुला पहिले हार घालणार आहे.
नववधूचा हा इशारा पाहून नवरदेव तिला जी प्रतिक्रिया देतो ती खरोखरच सगळ्यांना आवडली आहे. लोकं या दोघांच्या जोडीचे आणि त्यांच्या प्रेमाचे कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात आवडत आहे. हेच कारण आहे की, अनेक यूजर्स व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
एका यूजरने म्हटले, 'हा व्हिडीओ खरोखर मजेदार आहे. दुसरीकडे, दुसऱ्या यूजरने लिहिले की, मला त्यांची केमिस्ट्री खूप आवडली. या व्यतिरिक्त, इतर अनेक यूजर्सनी या व्हिडीओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले आहे.
हा मजेदार व्हिडीओ Official Niranjanm87 नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. ही बातमी लिहिण्यापर्यंत या व्हिडीएला लाखो वेळा पाहिले गेले आहे आणि 37 हजारांहून अधिक लोकांनी त्याला पसंत देखील केलं आहे.