Weather Update: पर्वतीय भागात हिमस्खलनासोबत उर्वरित भारतामध्ये पावसाचा इशारा; पाहा Latest Alert

Weather Update: हवमान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा कडाका वाढेल. तर, दक्षिणेकडे मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. त्यामुळं सहलीसाठी निघण्याआधी ही बातमी पाहाच   

Updated: Feb 4, 2023, 08:11 AM IST
Weather Update: पर्वतीय भागात हिमस्खलनासोबत उर्वरित भारतामध्ये पावसाचा इशारा; पाहा Latest Alert  title=
Weather Update winter wave rain predictions latest Marathi news

Weather Update: देशभरात सुरु असणारी थंडीची लाट अद्यापही संपुष्टात आलेली नाही. ज्याचे परिणाम देशभरातील हवामान बदलामध्ये दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातील काही भागांमध्ये थंडीचं प्रमाण तुलनेनं कमी झालं. पण, उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र परिस्थिती जैसे थे पाहायला मिळाली. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या पर्वतीय भागांमध्ये (Snowfall) बर्फवृष्टीसोबतच (Snowstorm) हिमवादळाचा धोका उदभवू शकतो. तर, मैदानी प्रदेशांना पावसाचा तडाखा बसू शकतो. 

देशाच्या कोणत्या भागांवर असणार धुक्याची चादर ? 

स्कायमेटनं (Skymet) वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशातील बहुतांश क्षेत्रावर धुक्याची चादर असेल. याशिवाय पश्चिम बंगाल, पंजाब (Punjab), हरियाणा (Hariyana) आणि राजस्थानमध्येही (Rajasthan) काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळेल. तुलनेनं (South India) देशाच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी असणार आहे. गेल्या 24 तासांमध्ये तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) पावसाच्या सरी बरसल्या. ज्यामागोमाग आता केरळच्या (Kerala) दक्षिण पट्ट्यामध्येही ढगाळ वातावरण आणि पावसाची उपस्थिती दिसून येऊ शकते. 

हेसुद्धा वाचा : तेच कपडे पुन्हा वापरले? Radhika Merchant च्या साधेपणानं जिंकली मनं; पाहून म्हणाल अंबानींची होणारी सून लाखात एक

 

देशाच्या अती उत्तरेकडे असणाऱ्या (Ladakh) लडाख, (Jammu Kashmir) जम्मू काश्मीर, सीमेलगतच्या बाल्टिस्तान- गिलगिट क्षेत्रातही हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पश्चिमी वाऱ्यांमध्ये पश्चिमी झंझावातही सक्रीय आहे, पण त्यांचा प्रभाव कमी असल्याचं दिसत आहे. देशाच्या दक्षिणेकडील ढगाळ वातावरणाचे थेट परिणाम महाराष्ट्रातही दिसून येतील. इथं कोकण किनारपट्टी भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. 

राज्यात थंडीचा कडाका वाढणार 

देशभरात कुठे थंडी तर कुठे पावसाचा तडाखा बसत असल्यामुळं हवमानाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. महाराष्ट्रात यामुळं तापमानाच घट नोंदवण्यात येईल. शेतमालावर याचा थेट परिणामही होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

 

उत्तराखंडच्या पर्वतीय भागांना हिमवादळ आणि हिमस्खलनाचा धोका 

हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार (Uttarakhand) उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागात येणाऱ्या 3 हजार मीटरहूनही उंच भागात असणाऱ्या क्षेत्रांमध्ये हिमस्खनाचा (Avalanche) इशारा देण्यात आला आहे. ज्यामुळं प्रशासनही सतर्क आहे. सध्या या भागामध्ये लोकांची गर्दी नाही, पण मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र रहिवासी संख्या जास्त असल्यामुळं प्रशानानं सर्वच सावधगिरी बाळगली आहे.