ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहिल - हवामान विभाग

मान्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 3, 2018, 07:50 PM IST
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहिल - हवामान विभाग title=

नवी दिल्ली : मान्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये देशाच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, तो ८ टक्के कमी किंवा अधिक राहील, असे म्हटलेय.

आयएमडीच्या अलिकडच्या अंदाजानुसार, ऑगस्टमध्ये ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जूनमध्ये जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा ऑगस्टमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तथापि, ९ टक्के किंवा त्याहून अधिक पडण्याची शक्यता आहे.

आयएमडी मते, सामान्य किंवा सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ९४ ते १०६ टक्के पाऊस पडला किंवा मान्सूनच्या हंगामात १०६ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर तो सरासरी पावसापेक्षा अधिक मानला जातो.

बिहार, झारखंड आणि पूर्वेकडील राज्य वगळता चांगला पाऊस झालाय. दोन महिने देशात चांगला पाऊस झालाय. दरम्यान, पावसाळा अनुकूल परिस्थिती असेल अशी अपेक्षा आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाच्या मते, चालू मान्सून हंगाम शेत लागवडीसाठी अनुकूल आहे.