तुमच्या मोबाईलमध्ये UIDAI नावाने नंबर सेव्ह झाला अन् ...

 UIDAI सोशल मीडियावर शुक्रवारी ट्रोल झाले आहे. अनेक प्रश्नांचा मारा करण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 3, 2018, 06:38 PM IST
तुमच्या मोबाईलमध्ये UIDAI नावाने नंबर सेव्ह झाला अन् ... title=

मुंबई : ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी ट्विटरवर आपला आधार नंबर सार्वजनिक केला. त्यानंतर काही दिवसात UIDAI सोशल मीडियावर शुक्रवारी ट्रोल झाले. UIDAIवर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. एन्ड्रॉय स्मार्टफोन यूजरच्या कॉन्टेक्ट लिस्टमध्ये अचानक UIDAI हेल्पलाइन नंबर १८००३००१९४७ सेव्ह झाला. त्यानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

आधारचा आयडेन्टिफिकेशन ऑथॉरटी ऑफ इंडिया (UIDAI) नंबर आपोआप सेव्ह झाल्यामुळे अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. १८००-३००-१९४७ हा आधारचा मदतक्रमांक अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला आहे. विशेष म्हणजे मोबाईल वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय हा क्रमांक फोनबुकमध्ये सेव्ह झाला आहे. आधार आणि सिम कार्ड कंपनीने याबबत हात वर केलेत. यानंतर नेटीझन्सनी आधार कार्ड आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत टीका केलेय.

जागतिक सुरक्षातज्ज्ञ इलियट अल्डरसन यांनीही याबाबत ट्विटरवरुन यूआयडीएआयला प्रश्न विचारला आहे. ग्राहकांच्या कोणत्याही आधार कार्डचा हेल्पलाईन नंबर मोबाईलमध्ये सेव्ह का करण्यात आला आहे, ते समजेल का?, असा प्रश्न अल्डरसन यांनी विचारलाय. एका नेटीझन्समे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधार कार्ड क्रमांक शेअर करण्याचे आव्हान दिले आहे. अन्य एका व्यक्तीने आधार कार्डचा फोटो शेअर केला आहे, त्यावर तो नंबर आहे. १८००-३००-१९४७ हा नंबर आधारवर आहे. या प्रकारचा आधारचा हेल्पलाईन नंबर नाही असे कसे म्हणू शकता असा प्रश्न विचारलाय.