पायात पैंजण केव्हा घालावेत याची योग्य वेळ असते का?

लग्नाआधी की लग्नानंतर पायात पैंजण घालणं कधी योग्य? जाणून घ्या काय बरोबर काय चुकीचं?

Updated: Feb 28, 2022, 02:11 PM IST
पायात पैंजण केव्हा घालावेत याची योग्य वेळ असते का?  title=

मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांसाठी पायामध्ये चांदीचे दागिने घालणं अत्यंत शुभं मानलं जातं. अगदी मुलीच्या जन्मापासून ते सासरी पाठवण्यापर्यंत अनेक सोहळ्यात किंवा तिच्या अंगावर काही ना काही कारणांनी दागिने घातले जातात. मात्र पूर्वी पायात पैंजण घालण्याची परंपरा केवळ लग्नानंतरच होती. 

आजकाल पायात पैंजण किंवा अँकलेट घालण्याची पद्धत रुढ होत आहे. तरुणी लग्नाआधीच पायात पैंजण घालतात. भारतीय परंपरेत पायात चांदीचे पैंजण घालण्यालाही एक विशेष महत्त्व आहे. हिंदू महिला लग्नानंतर साजश्रृंगार करतात. लग्नामध्ये त्यांच्या पायात पैंजण घातले जातात हे पैंजण त्यानंतर पायातून उतरवले जाऊ नयेत असं सांगितलं जातं. 

पायात पैंजण घालण्यामागे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. पायात पैंजण हे लग्नानंतर महिलांच्या सौभाग्याचं लक्षण आहे. मात्र यामागचं वैज्ञानिक कारण जाणून तुम्ही हैराण व्हाल.

एका अहवालानुसार असं मानलं जातं की पायात पैंजण हे सौभाग्याचं लेणं आहे. मात्र वैज्ञानिक कारण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. पैंजण घातल्यामुळे पायाची हाडं मजबूत होतात. चांदीमुळे शरीरातील उष्णता शोषून घेतली जाते. त्यामुळे हे वैज्ञानिक कारण लक्षात घेऊन लग्न झालेल्याच नाही तर तरुणीही पायात पैंजण घालू शकतात. 

पायात पैंजण घातल्यानंतर पायाच्या त्वचेवर हलका दाब पडतो. त्यामुळे हाड मजबूत होण्यासाठी मदत करतात. पायात सूज येत असेल तर ती देखील कमी करण्यासाठी मदत होते. शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करते. पैंजण पायात घाल्यानंतर त्यांची इच्छाशक्ती खूप जास्त वाढते असंही म्हटलं जातं. 

Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.