नवी दिल्ली : मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी अफगानिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात एक मोठी बैठक आयोजित केली होती. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगानिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परत आणण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सूत्रांनुसार, पीएम मोदी म्हणाले की, भारतात येणाऱ्या प्रत्येक अल्पसंख्याकांना मदत केली जाईल. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनएसए अजित डोवाल उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना येत्या काही दिवसांत अफगानिस्तानातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी असेही म्हटले की, भारताने केवळ आपल्या नागरिकांचे संरक्षण करू नये, तर आपण शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांनाही आश्रय दिला पाहिजे जे भारतात येऊ इच्छितात आणि आम्ही सर्व शक्य मदतही केली पाहिजे. मदतीसाठी भारताकडे पाहणाऱ्या आमच्या अफगाण बांधवांना मदत करा.
पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव डॉ पीके मिश्रा, एनएसए अजित डोभाल आणि कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. असे मानले जाते की परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि राजदूत रुद्रेंद्र टंडन देखील बैठकीत उपस्थित होते. राजदूत टंडन काबूलहून येणाऱ्या विमानाने आज जामनगरमध्ये दाखल झाले.
यासाठी हेल्पलाईन नंबर ही सुरु करण्यात आला आहे.
फोन नंबर: +91-11-49016783, +91-11-49016784, +91-11-49016785
व्हॉट्सअॅप क्रमांक: +91-8010611290
ई-मेल: SituationRoom@mea.gov.in
दुसरीकडे, काबूलमधून 120 भारतीयांना घेऊन आज भारतात दाखल झाले. सी -17 ग्लोबमास्टर विमान प्रथम गुजरातमधील जामनगर येथे थांबवण्यात आले. त्यानंतर ते हिंडन एअरबेसवर आणण्यात आले. परत आलेल्यांमध्ये भारतीय दूतावासाचे अनेक कर्मचारी, तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि काही भारतीय पत्रकारांचा समावेश आहे. भारतीय दूतावासातील सर्व लोक परत आले आहेत.