PF आणि पेन्शनच्या पैशांची काळजी असेल, तर हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये नक्की ठेवा

EPFO चे सदस्य DigiLocker वापरून आणखी तीन कागदपत्रे डाउनलोड करू शकता.

Updated: Sep 25, 2021, 07:08 PM IST
PF आणि पेन्शनच्या पैशांची काळजी असेल, तर हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये नक्की ठेवा title=

मुंबई : तुम्ही नोकरी करत आहात आणि तुमचा PF देखील कट होत आहे, तर तुम्हाला काही गोष्टीची माहिती असणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुमचा फायदा होईल. EPFO ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ताज्या घोषणेनुसार, आता त्यांना EPFO यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर, डिजीलोकरवर स्कीम प्रमाणपत्र यासारख्या सेवा मिळू शकतात. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO), सामाजिक सुरक्षा प्रशासन संस्थेने, एका ट्विटद्वारे आपल्या सर्व ग्राहकांना डिजीलॉकरद्वारे मिळू शकणाऱ्या नवीन सेवांबद्दल माहिती दिली आहे.

EPFOच्या ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, सदस्य यूआयएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि DigiLockerद्वारे स्कीम प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात. आपण आपल्या फोनमध्ये हे अॅप कसे डाउनलोड करू शकता आणि या अॅपवर आपल्याला कोणत्या सेवा मिळतील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

EPFO चे सदस्य DigiLocker वापरून आणखी तीन कागदपत्रे डाउनलोड करू शकता. ही कागदपत्रे आहेत: यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) आणि योजना प्रमाणपत्र. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, डिजीलोकरवर वरील नमूद केलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी, ईपीएफओ सदस्यांना DigiLockerवर स्वतंत्रपणे नोंदणी करणे आणि त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे.

सुरूवातीला हे जाणून घ्या की, DigiLocker म्हणजे काय?

डिजिटल लॉकर एक वर्चुअल लॉकर आहे, ज्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै 2015 मध्ये केली होती. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत DigiLocker सुरू करण्यात आले. DigiLocker खाते उघडण्यासाठी तुमच्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. DigiLockerमध्ये देशातील नागरिक पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादीसह कोणतेही सरकारी प्रमाणपत्र साठवू शकतात.

Digilocker कडून UAN किंवा PPO क्रमांक कसा मिळवायचा?

सर्वप्रथम तुम्हाला https://digilocker.gov.in/ या लिंकवर जावे लागेल. त्यानंतर ‘Sign In’ वर क्लिक करून तुमच्या खात्यात लॉग इन करा. आपले आधार किंवा यूजरनेम प्रविष्ट करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी टाका आणि सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर 6 नंबर सिक्युरिटी पिन टाका आणि सबमिटवर क्लिक करा.

आता 'Issued Documents' वर क्लिक करा. एक नवीन पान उघडेल. येथे तुम्हाला 'Get more issued documents' वर क्लिक करावे लागेल. 'Central Government' टॅब अंतर्गत, 'Employees Provident Fund Organization' वर क्लिक करा.

स्क्रीनवर एक नवीन पान दिसेल. UAN वर क्लिक करा आणि UAN क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, 'Get Document' वर क्लिक करा. या चरणांनंतर, जारी केलेले दस्तऐवज विभागात डेटा सेव्ह केला जाईल. तेथून तुम्ही तुमचे UAN कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.