बँकेचे खाते निष्क्रिय झाले आहे का?, RBIचा मोठा निर्णय

Want to reactivate dormant bank account?​ : काहीवेळा काही लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी बँकांमध्ये खाती उघडावी लागतात. मात्र, नंतर त्या खात्यांमधून बराच काळ कोणताही व्यवहार होत नसतो. तुमचे बँक खाते निष्क्रिय झाले आहे का?  

& Updated: Jul 26, 2022, 02:59 PM IST
बँकेचे खाते निष्क्रिय झाले आहे का?, RBIचा मोठा निर्णय  title=

मुंबई : Want to reactivate dormant bank account? : काहीवेळा काही लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी बँकांमध्ये खाती उघडावी लागतात. मात्र, नंतर त्या खात्यांमधून बराच काळ कोणताही व्यवहार होत नसतो. त्यामुळे अशी खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार निष्क्रिय होतात. बँक खाते निष्क्रिय झाले आहे का? किंवा बंद पडलेल्या बँक खात्यामुळे अडकलेले पैसे काढता येत नाहीत का? मग एक सोपा मार्ग भारतीय रिझर्व्ह बँकने (Reserve Bank of India) सूचवला आहे. या सोप्या  मार्गाचा अबलंब केला तर तुमची समस्या चुटकी सरशी सुटेल. 

आजच्या डिजिटल जगात, बँक खाते उघडणे खूप सोपे आहे. परंतु अनेकवेळा अनेक बँक खाती असलेले लोक काही चुका करतात, ज्यामुळे खाते निष्क्रिय किंवा बंद होऊ शकते. तुम्ही तुमचे खाते गमावल्यास, तुम्ही त्या खात्यातील तुमचे पैसे देखील गमावू शकता. तुमचे खाते सुरक्षित राहावे यासाठी येथे काही गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. मात्र निष्क्रिय खाते पुन्हा तुम्ही सुरु करु शकता.

बँकेचे खाते निष्क्रिय झाले असले तर तुम्ही तुमच्या बँकेला संपर्क करा. खाते अ‍ॅक्टिवेट करा आणि रकमेवर दावा करु शकता. सार्वजनिक हितार्थ हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहेत. आरबीआय सल्ला दिला आहे, जाणकार बना. आणि हो, सतर्क राहा, असे आवाहन RBIकेले आहे. 

बँक खाती का होतात निष्क्रिय?

तुमची बँक खाती का होतात निष्क्रिय?, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर  तुम्ही एफडी किंवा आरडी खाते उघडले असेल आणि त्यात 8 वर्षे व्यवहार केले नाहीत तर ते निष्क्रिय घोषित केले जाते. तसेच बचत खाते आणि चालू खात्यासाठी ही मुदत फक्त दोन वर्षे आहे. त्यानंतर ती खाती निष्क्रिय घोषित करुन त्यातील रक्कम DEAF कडे पाठवली जाते.