Woman Walking On Water Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होतं असतात. गेल्या आठवड्यात गरम तव्यावर बसणाऱ्या बाबाने लोकांना वेड लावलं होतं. त्याचं सत्य उघड केल्यावर तो पळून गेला. त्यानंतर पाण्यावर तरंगणारा बाबाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हिंगोलीतील हा बाबा पाय न हलवता पाण्यावर अर्धा तास तरंगत होता. हा चमत्कार नसून ही एक कला आहे हे सिद्ध करण्यासाठी अंनिस कार्यकत्याने पाण्यात उडी मारून पाण्यावर कसं तरंगतात ते दाखवलं.
आता काय एक नवीन चमत्कार दाखविणारा व्हिडीओ इंटरनेवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून यूर्जसचं डोक चक्रावलं आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पांढऱ्या रंगाची साडी नसलेली पाण्यावर चालताना दिसत आहे. लोकांना हा चमत्कार वाटला आणि ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. हा व्हिडीओही लोकांच्या मोबाईलवर पसरायला लागला.
ही वृद्ध महिला दुसरी तिसरी कोणी नसून ही नर्मदा देवी आहे, अशी अफवा वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. पाण्यावर चालणारा हा चमत्कार एक देवीच करून शकते असा लोकांनी अंधविश्वास ठेवला. एवढंच नाही तर लोक तिची पूजा करु लागले. हा व्हिडीओ ट्वीटरवर @manishkharya1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
जबलपुर मध्यप्रदेश में नर्मदजी के जल पर चलती नजर आई महिला! नजरो का धोखा,,,?#वीडियोवायरल#Jabalpur #jabalpurnews #narmadaji #BreakingNews #latestnews #MPNews #MadhyaPradesh pic.twitter.com/OcU03KrQLg
— manishkharya (@manishkharya1) April 9, 2023
या व्हिडीओमागील सत्य जाणून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. हा व्हिडीओ म्हणजे अंधश्रद्धा पसरविणारा ठरला आहे. या व्हिडीओची पोलिसांनी दखल घेतल्या त्या महिलेचं सत्य समोर आलं. हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील जबलपूरमधील आहे. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतल्यावर अनेक ध्ककादायक खुलासे समोर आले आहेत.
या महिलचं नाव ज्योतीबाई असून तिन 51 वर्षांची आहे. ती नर्मदापूरची रहिवासी असून ती मे 2022 पासून घरातून बेपत्ता होती. तिच्या मुलाने आई बेपत्ता असल्याची तक्रारही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. त्याने सांगितल्या प्रमाणे त्याची आई ही मानसिक रुग्ण आहे.
या व्हिडीओमागील सत्य सांगताना पोलिसांनी सांगितलं की, ज्या ठिकाणी ही महिला चालत असल्याचं वाटलं त्या ठिकाणी नदीत पाणी कमी होतं. दूर असं वाटलं की पाण्यावरुन चालत आहे. पोलिसांनी तिला विचारलं की तुझे कपडे ओले नव्हते, त्यावर ती महिला म्हणाली की, तिने नदीत आंघोळ केली होती पण उन्हामुळे तिचे कपडे लगेचच सुकले होते.
दरम्यान पोलिसांनी असे दिशाभूल करणाऱअया व्हिडीओपासून दूर राहण्याचा आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देऊन नये, शिवाय सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल करुन ये, अशी ताकद दिली आहे.