एक सेकंद उशीर झाला असता तर...Video पाहून काळजाचा ठोका चुकला

जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नसतं. जन्म आणि मृत्यू हा नशिबाचा खेळ आहे. 

Updated: Aug 6, 2022, 02:27 PM IST
एक सेकंद उशीर झाला असता तर...Video पाहून काळजाचा ठोका चुकला title=
viral video this is called dodging death in 1 second if you do not believe watch this dangerous in marathi

Viral Video : जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नसतं. जन्म आणि मृत्यू हा नशिबाचा खेळ आहे. काही लोकांचं नशीबच खराब असतं काही चुक नसतानाही यमराज त्यांना गाठतो. मात्र काही लोकांचं नशीब किती बलवत्त असतं याचा प्रत्यत हा व्हिडीओ पाहिल्यावर येतो. सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ तुफान व्हायरल (viral video) होतो आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकांऊटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला पण नशिबावर विश्वास ठेवावसा वाटतो.  

यमराज लंचब्रेकवर होता का?

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला प्रश्न पडेल की यमराज काय लंचब्रेकवर गेला होता का? सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये एका माणसाने मृत्यूला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. रस्त्याने चालतानाही मृत्यू कुठे आणि कसा आपल्याला गाठेल हे सांगता येत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक माणूस रस्त्यावरुन जात असताना. एका दुकानाकडे जातो आणि त्याचा धानीमनी नसताना एका सेकंदात त्याचासोबत जे होतं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. (viral video this is called dodging death in 1 second if you do not believe watch this dangerous in marathi)

एक सेकंदात होत्याचं नव्हतं झालं असतं. जसा हा माणूस दुकानाच्या फूटपाथावर पाय ठेवतो तशी ती जमीन खाली धसते आणि मोठी दुर्घटना होण्यापासून टळते. मृत्यूला स्पर्श करुन हा माणूस वाचला असतो. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा सगळ्या प्रकार बघून मन सुन्न होऊन जातं. एक सेकंद पण उशीर झाला असता तर या माणसांचा जीव गेला असता. 

''त्याचा जागी तुम्ही असता तर...?''

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला तेव्हा त्याला एक कॅप्शन दिलं आहे. ते कॅप्शन वाचून सध्या युर्जसचं डोकं चक्रावलं आहे. ते म्हणतात की,''मी या विकेंडला हा विचार करतो आहे की, ब्रह्मांड या माणसाला काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या जागी तुम्ही असता तर काय तुम्हाला काय वाटलं असतं?''

ही घटना कुठली आहे यासंदर्भात अजून माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ पाहून एवढंच म्हणता येईल की नशीबवान आहे हा माणूस.