Viral Video : हाच का अतुल्य भारत? इंडिया गेटजवळ रशियन महिलेपुढं अश्लील डान्स, म्हणे 'यही वाली...'

Viral Video : तो तिच्या मागेपुढे घिरट्या घालू लागला आणि तिला काही कळायच्या आतच... व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांचा संताप   

सायली पाटील | Updated: Oct 24, 2024, 10:30 AM IST
Viral Video : हाच का अतुल्य भारत? इंडिया गेटजवळ रशियन महिलेपुढं अश्लील डान्स, म्हणे 'यही वाली...' title=
Viral video russian tourist being harassed at india gate by commoner watch

Viral Video : पर्यटन हा सध्याचा चर्चेत असणारा आणि अनेकांच्याच आवडीचा विषय. भटकंती आवडत नाही, असं म्हणणारे फार कमीजण आहेत. थोडक्यात सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी नवनवीन ठिकाणी जाण्याला अनेकांचीच पसंती असते. यातूनच अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याचं कामही होत असतं. पण, भारतात मागील काही वर्षांमध्ये मात्र पर्यटन क्षेत्रामध्ये काही नकोशा प्रकरणांमुळं चिंतेत भर पडली आहे. 

महिलांची सुरक्षिकतता, विनयभंगाचे प्रसंग या आणि अशा कारणांमुळं मानसिकतेचा पुन्हापुन्हा विचार करण्याचीच वेळ येतेय. अगदी असाच काहीसा प्रसंग नुकताच दिल्लीगीत इंडिया गेटपाशी घडला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आणि तो पाहताच अनेकांच्याच तळपायाची आग मस्तकात गेली. 

इंडिया गेट आणि नजीकचा परिसर पाहण्यासाठी कामयच भारतीय आणि परदेशी पर्यटकांची गर्दी असते. अशा पर्यटकांच्या गर्दीमध्ये नुकतंच एका रशियन महिला पर्यटकाला विचित्र प्रसंगांचा सामना करावा लागला. जिथं, एका हुल्लडबाज तरुणानं परदेशी महिला पर्यटक दिसताच तिच्यापुढे घिरट्या घालण्यास सुरुवात केली. अश्लील हावभाव करत डान्सही केला. सुरुवातीला ही गोष्ट हसण्यावारी नेणाऱ्या या महिलेला काहीतरी बिनसत असल्याचं लक्षात येताच तिचे हावभाव बदलले, ती काहीशी संकोचल्या नजरेनं त्याला पाहू लागली. पण, हा तरुण काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. 

हेसुद्धा वाचा : Diwali Share Trading : दिवाळीच्या मुहूर्तावर करा 5 खात्रीशीर शेअरमध्ये गुंतवणूक; घसघशीत परताव्याची दाट शक्यता 

तिच्यापुढं डान्स करणं, विचित्र हावभाव करणं आणि हा सर्व प्रकार रीलसाठी shoot सुद्धा करण्यात आला. इतक्यावरच न थांबला तो सोशल मीडियावर शेअरही करण्यात आला. हा व्हिडीओ मनोरंजनासाठी नसून, त्यात घडणारा प्रकार अतिशय आक्षेपार्ह आणि अपमानास्पद असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी घडल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. एकिकडे पर्यटकांसाठी भारत किती सुरक्षित देश आहे हेच सातत्यानं सांगितलं जात असताना दुसरीकडे मात्र या हुल्लडबाजांसारख्या माणसांमुळं मलिन होणारी देशाची प्रतिमाही अतिशय गंभीर असल्याचा मुद्दा अनेकांनी अधोरेखित केला.