कारमधून उतरुन दाखवली श्रीमंती, पण शेवटी निघाली 'चिल्लर चोर'; पाहा या महिलांचा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिला कारमधून बाहेर पडतात आणि रस्त्यावर चालू लागतात.

Updated: Nov 20, 2021, 08:11 PM IST
कारमधून उतरुन दाखवली श्रीमंती, पण शेवटी निघाली 'चिल्लर चोर'; पाहा या महिलांचा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी-कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. तर काही व्हिडीओ आपल्याला हसायला भाग देखीस पाडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय बोलावे आणि काय करावे हेच सुचनार नाही. हा व्हिडीओ दोन महिलांशी संबंधित आहे, या महिला रात्रीच्या अंधारात अशी काही गोष्ट करतात की, तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिला कारमधून बाहेर पडतात आणि रस्त्यावर चालू लागतात. पाहता पाहता या महिला अशा एका गोष्टीची चोरी करतात, ज्याची तुम्ही कल्पना देखील करु शकणार नाही.

तुम्हाला त्या महिलांना पाहून सुरुवातीला वाटणार देखीस नाही की, त्या चोरीच्या उद्देशाने तेथे आल्या असाव्यात. काही सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही तासांतच इतका व्हायरल झाली की, त्याला हजारो वेळा पाहिले गेले आहे. नेटिझन्सही त्यावर जोरदार कमेंट केल्या आहेत आणि अजून देखील या व्हिडीओवरती कमेंट्स येत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात एक कार रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे, मात्र थोडे अंतर गेल्यावर ती कार यू-टर्न घेते. यानंतर दोन महिला कारमधून बाहेर येताता आणि चालायला लागतात. सुरूवातीला एक स्त्री रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांजवळ येते आणि क्षणभर थांबल्यानंतर निघून जाते.

यानंतर, काळ्या पोशाखात आणखी एक महिला दिसत आहे, ती महिला रस्त्यावर लावलेल्या रोपाजवळ जाते आणि लगेच एक रोप उपटून टाकले आणि ते रोप घेऊन चालत जाऊन कारमध्ये जाऊन बसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही खूप आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे या महिलेच्या हातात आणखी एक रोप आधीच असते. जे तिने मागून उखडले होते, ज्यामुळे ते कॅमेरात कैद झाले नाही. पण त्यानंतर या दोन्ही महिला कारमधून पळून गेल्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सही जोरदार कमेंट केल्या आहेत. अशाच एका वापरकर्त्याने सांगितले की, आता झाडेही सुरक्षित नाहीत. एका कमेंटमध्ये असे म्हटले होते – मोठे लोकही चोरी करू शकतात. एका वापरकर्त्याने सांगितले - त्यांच्या कारला योग्य दर्जा नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर memes.bks या पेजवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.