रेसॉर्टमध्ये पाण्याची मज्जा घेणं तरुणाला भलतंच पडलं महागात, पाहा व्हिडीओ

तरुणासोबत काही वेळेला असा काही प्रकार घडेतो की याची त्यांना स्वत:ला सुद्धा कल्पना नसते.

Updated: Oct 20, 2021, 09:30 PM IST
रेसॉर्टमध्ये पाण्याची मज्जा घेणं तरुणाला भलतंच पडलं महागात, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात तुम्हाला कधी, केव्हा, कोणती मजेदार गोष्ट पाहायला मिळेल हे सांगणं तसं शक्य कठीण आहे. परंतु जेव्हा ही तुम्हाला असं काही पाहायला मिळतं ते अगदी मजेदार असतं, ज्याला तुम्ही दोन ते तीन वेळा पाहण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही. सध्या सोशल मीडियावरती आपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळताता जे पाहून तुम्हाला तुमचं हसू अवरणार नाही. सोशल मीडियावरती लोकं प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स मिळण्यासाठी काहीही करायला तयार असता. परंतु काही वेळेला लोकांना असा प्रयोग करणे भलतेच माहागात पडले आहे.

सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रेसॉर्टमध्ये स्टाईल मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो भलताच फसतो, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत देखील होते.

व्हायरल झालेला व्हिडीओ वॉटर पार्कमधील आहे, ज्यात तुम्ही पाहू शकता की, काही लोक रोलर कोस्टर राइडचा आनंद घेत आहेत. त्याच वेळी, रोलर कोस्टरच्या खालच्या बाजूला  एक तरुण स्टाईलमध्ये उभा आहे. हा तरुण रोलर कोस्टरचं पाणी स्वत:वर उडवून घेण्याचा आनंद लूटण्यासाठी तेथे उभा असतो.

या व्यक्तीच्या जवळच काही लोकं देखील उभे आहेत. हे लोकं रेनकोर्ट घालून तेथे आनंद घेण्यासाठी उभे आहेत. परंतु हा तरुण मात्र मोठ्या थाटात आपले हात मागे करुन पाणी उडण्याची वाट पाहात राहातो. परंतु त्याला असे करणे भारी पडते.

कारण या रोलर कोस्टरचा वेग इतका असतो की, त्यातून उडणारे पाणी इतक्या फोर्सने येते, ज्यामुळे तो तरुणाशी खाली पडतो. या तरुणासोबत असा काही प्रकार घडेल याची त्याला स्वत:ला सुद्धा कल्पना नसते.

काही सेकंदांचा हा व्हिडीओ ट्विटरवर red fred035schultz नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ट्वीटरवर शेअर केल्यापासून ते आतापर्यंत 11 हजारपेक्षा लोकांनी या व्हिडीओला पाहिलं आहे. तर शेकडो लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर, लोक त्यावर आपले मत देखील व्यक्तं करत आहेत.