मुंबई : 'सोशल मीडियाचं जग'ही अप्रतिम आहे. दररोज एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ येथे व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडीओ धक्कादायक असतात, तर काही इतके मजेदार असतात की, ते पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचं हसु आवरणार नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीसोबत शॉपिंगमॉलमध्ये जे करते ते पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही. पण यानंतर तिच्यासोबत जे काही घडलं ते कदाचित या मुलीलाही कळले नाही.
या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीही म्हणाल की, कुठेही बसण्यापूर्वी एकदा नक्की विचार करावा.
हा व्हिडीओ केवळ 16 सेकंदांचा आहे, मात्र सोशल मीडिया यूजर्सकडून याला खूप पसंती मिळत आहे. यामुळेच काही तासांत याला 2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील असल्याचे दिसते.
जिथे एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत काही शॉपिंग करायला येते. पण तिला थकवा जाणवतो आणि ती तिथेच ठेवलेल्या एका बॉक्सवर बसण्याचा प्रयत्न करते. जे घडलं, त्याचा या मुलीने कधीही विचार केला नसावा.
त्या बॉक्सवर ही मुलगी बसताच तो बॉक्स फोल्ड होतो आणि ही मुलगी जमिनीवर कोसळते. खरतर तो बॉक्स रिकामी असल्याने तो त्या मुलीचे वजन घेऊ शकला नाही.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर घंटा नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सावध रहा.'
व्हिडिओ पाहिल्यानंतर, अनेक लोकं यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी स्वत:ला रोखू शकले नाहीत. कुणी महिलेला वजन कमी करण्याचा सल्ला दिला, तर कुणी तिची खिल्ली उडवली आहे.
मजेशीर स्वरात कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, 'हा व्हिडीओ आपल्याला शिकवतो की कोठेही बसू नये.' त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, 'जिमनंतर मॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका.'