लग्नात जेवण्यासाठी प्लेट घेऊन गेलेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार, व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल दया

सध्या लग्नाचा सिजन सुरू असल्याने आपल्याला सोशल मीडियावरती लग्नाचेच व्हिडीओ पाहायला मिळतात.

Updated: Feb 5, 2022, 07:04 PM IST
लग्नात जेवण्यासाठी प्लेट घेऊन गेलेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार, व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल दया title=

मुंबई : सध्या लग्नाचा सिजन सुरू असल्याने आपल्याला सोशल मीडियावरती लग्नाचेच व्हिडीओ पाहायला मिळतात. आपण नेहमीच सोशल मीडियावर नवरा-नवरीचे मजेदार किस्से पाहातो. परंतु यावेळी जो व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, तो काहीसा वेगळा आहे. हा व्हिडीओ लग्नात उपस्थीत राहिलेल्या एका मित्राचा आहे. लग्न म्हटलं की, मज्जा मस्ती ही होतच राहाते. यामध्ये लोकांसोबत देखील बऱ्याचदा असा किस्सा घडतो. जो आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात राहातो.

लग्नात तुम्ही हे ऐकले किंवा पाहिले असेल की, काही मित्र प्लॅनिंग करत त्यांच्या खास मित्रांसोबत काहीतरी प्रँक करतात. असंच काहीसं या व्हिडीओमध्ये घडलं आहे.

लग्नात काही मुलं जेवणासाठी जमा झाले आहेत आणि ते हातात प्लेट घेऊन जेवण वाढणाऱ्या व्यक्तीकडे जातात. येथे हा व्यक्ती प्रत्येकाच्या ताटात जेवण देत असतो. त्यादरम्यान एक तरुण तेथे ताट पकडून उभा राहातो. परंतु तरीही त्याला ताटात जेवण मिळत नाही. त्याच्या मागे एका मागून एक त्याचे मित्र येतात. त्यांना ताटात या व्यक्तीकडून जेवण दिले जाते. मात्र या तरुणाला तो व्यक्ती जेवण देत नाही.

हा तरुण काही वेळ हातात ताट पकडून उभा राहातो. परंतु हा सगळा प्रकार त्याला सहन होत नाही आणि तो आपल्या हातातील ताट फेकून देतो.

असे सांगितले जाते की, जेवण वाढणारा व्यक्ती आणि मागून येणारे लोक हे सगळेच, त्या हातात ताट धरुन उभ्या राहाणाऱ्या तरुणाचे मित्र आहेत. या मित्रांनी ठरवून त्याच्यासोबत प्रँक करण्याचे ठरवले.

या तरुणाचा संताप आणि रिएक्शन पाहून उपस्थीत सगळेच लोकं हसू लागले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती घंटा नावाच्या अकाउंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवर एक यूजर लिहिले की, 'थाली तोंडावर टाकायची होती, नाही का.' तसेच या व्हिडीओवरती अनेक लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.