मगरीला ती जेवण द्यायला गेली, पण मगरीनं तिच्या हातावरच ताव मारला... पाहा व्हिडीओ

मगर हा सर्वात भीतीदायक प्राणी आहे. ज्याच्यापासून लांब राहणंच केव्हाही चांगलं.

Updated: Apr 10, 2022, 11:39 PM IST
मगरीला ती जेवण द्यायला गेली, पण मगरीनं तिच्या हातावरच ताव मारला... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : मगर हा सर्वात भीतीदायक प्राणी आहे. ज्याच्यापासून लांब राहणंच केव्हाही चांगलं. परंतु काही लोक असे असतात, ज्यांना असे प्राणी पाळण्याचा छंद असतो. मात्र अशावेळी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण हे प्राणी कधी हल्ला करतील याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहाणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पाळलेली मगर आहे. या मगरीला अन्न देण्यासाठी एक मुलगी उभी असते.

ही मुलगी आपल्या हाताने या मगरीला खायला देत असते. तेवढ्यात ही मगर त्या मुलीचा हात आपल्या तोंडात घेते. हा व्हिडीओ पाहून आधी वाटतं की, या मगरीनं गंमतीनं किंवा प्रेमाने हात पकडला असावा. मग आपण विचार करतो की, मगर आता हात सोडेल, नंतर हात सोडेल परंतु मगर काही शेवटपर्यंत हात सोडत नाही.

ही मगर या मुलीचा हात ओढते, ज्यामुळे ती मुलगी पाण्यात पडते. परंतु तरी देखील ही मगर हात सोडत नाही. ज्यानंतर ही मगर या मुलीचा हात पक़डून पाण्यात गोल-गोल फिलू लागते. ज्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईलंच.

त्यावेळी तेथे एक व्यक्ती या मुलीच्या मदतीसाठी धावून येतो आणि मगरीचं तोंड उघडण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरी देखील मगर त्या मुलीचा हात सोडायला तयार नसते. हा संपूर्ण व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर Nature Is Metal या नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोक जोरदार कमेंट आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ खूपच भितीदायक आहे. हा व्हिडीओ अर्धा असल्यामुळे पुढे नक्की काय घडलं हे कळलेलं नाही. परंतु त्या मुलीला गंभीर दुखापत झाली असणार हे नक्की.