मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे फार मनोरंजक असतात. त्यात लोक बऱ्याचदा आपल्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात, ज्यामुळे त्यांना जास्त लाईक्स आणि व्ह्युज मिळतील. परंतु सगळ्याच लोकांना ते जमतंच असं नाही, कारण यासाठी जास्त प्रॅक्टीस करण्याची गरज असते. त्यामुळे बऱ्याच लोकांचा स्टंट फसतो आणि ते अनेकांसाठी उदाहरण म्हणून समोर येतात. असा एकच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन तरुण एका घराच्या छतावरती उभे आहेत. त्यांपैकी एक तरुण स्टंट करण्यासाठी उडी मारतो खरा परंतु त्यानंतर जे घडतं त्याचा त्याने स्वप्नात देखील विचार केला नसावा.
हा तरुण उंच ठिकाणी उभा राहून मागचा पुढचा विचार न करता धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान, व्यक्ती स्वतःचे नुकसान करतो.
हा तरुण या घराच्या छतावर गोल फिरुन स्टंट करतो. इथपर्यंत सगळं बरोबर चाललं होतं, परंतु तेवढ्यात या तरुणाचा तोल जातो आणि तेथेच तो फसतो, कारण तो या इमारतीच्या छतावरुन खाली पडतो. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, तो ज्या प्रकारे खाली पडला, त्यामुळे त्याला खूप गंभीर दुखापत झाली असावी. parkour_extreme_youtube नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, 5 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. व्हिडीओ पाहून एका यूजरने 'तुझा जीव वाचवा आणि असं स्टंट करा' अशी कमेंट केली आहे.