Viral Video: कशाचीही तमा न बाळगता भाभीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका महिलेचा हरियाणी गाण्यावर (Hariyana Song) डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत विवाहित महिलेचा हा डान्स पाहून अनेकांनी सपना चौधरीची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.   

Updated: Mar 6, 2023, 07:48 PM IST
Viral Video: कशाचीही तमा न बाळगता भाभीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल title=

Viral Video: सोशल मीडिया (Social Media) म्हटलं की रोज नवनव्या गोष्टी व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या या व्हिडीओंमध्ये आपला व्हिडीओही असावा यासाठी अनकेजण प्रयत्न करत असतात. यामुळेच मग ट्रेंड होणाऱ्या म्युझिकवर आपले डान्स करताना किंवा इतर व्हिडीओ शेअर केले जातात. यामध्ये तरुणाई तर असतेच, पण अनेक विवाहित पुरुष आणि महिलाही असतात. अशाच एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Vidoe) झाला आहे. या व्हिडीओत महिला हरियाणी गाण्यावर डान्स करत असून सपना चौधरीचीच आठवण करुन देत आहे. 

सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असल्याने व्हिडीओ शूट करणं सोपं झालं आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ, फोटो दिसत असतात. रिलचं तर वेड लागलेलं असून नेमकं हेच घेरत मोबाइल कंपन्यांनीही कॅमेऱ्याच्या दर्जाकडे लक्ष दिलं आहे. आपणही अभिनेत्री, अभिनेत्यांप्रमाणे डान्स करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशीच इच्छा असणाऱ्या विवाहित महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओत महिला विवाहित असल्याचं स्पष्ट दिसत आहे. साडी नेसलेली ही महिला सपना चौधरीप्रमाणे डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला थोडीशी लाजताना दिसणारी ही महिला नंतर मात्र बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. 

महिलेने हरियाणामधील प्रसिद्ध ‘फेर जाइए हो पलटन में’ या गाण्यावर तुफान डान्स केला आहे. अनेकांनी महिलेच्या या डान्सचं कौतुक केलं आहे. महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.