Viral Video: नववधूला हातात उचलून घेत उतरत असतानाच नवरदेवाचा पाय घसरला अन् धाडकन...; सर्व पाहुणे लागले हसू

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका लग्नातील (Marriage) जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. लग्नात नवरदेव नववधूला घेऊन पायऱ्यावंर खाली उतरताना पाय घसरुन कोसळताना या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, नवरदेव प्रसंगावधान दाखवत पुन्हा उभा राहतो आणि फजिती होण्यापासून वाचवतो.   

Updated: Mar 8, 2023, 05:50 PM IST
Viral Video: नववधूला हातात उचलून घेत उतरत असतानाच नवरदेवाचा पाय घसरला अन् धाडकन...; सर्व पाहुणे लागले हसू title=

Viral Video: सध्या लग्नाचा हंगाम असल्याने सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ शेअर होत असतात. यातील काही व्हिडीओ हे प्रचंड व्हायरल (Viral Video) होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नवरदेव पाहुण्यांसमोर नववधूला उचलून घेतो आणि चांगलीच फजिती करुन घेताना दिसत आहे. नवरदेव खाली कोसळल्यानंतर तिथे उपस्थित पाहुण्यांनाही हसू आवरत नाही. 

व्हिडीओत काय आहे?

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, नवरदेव आपल्या लग्नातील क्षण कायमचा आठवणीत राहावा यासाठी नववधूला हातात उचलून घेत पायऱ्या उतरताना दिसत आहे. पण पायरीवर उतरत असतानाच नवरदेवाचा पाय घसरतो आणि नववधूला घेऊन तो धाडकन खाली कोसळतो. यानंतर तिथे उपस्थित पाहुणे हसू लागतात. पण नवरदेव मात्र नववधूला काही लागलं आहे का हे पाहतो. 

मात्र यावेळी आपली फजिती झाली आहे हे लक्षात येताच नवरेदव प्रसंगावधान दाखवत तिच्या कपाळावर किस करतो. पाहुण्याचं लक्ष आपण पडलोय याकडे जाऊ नये यासाठी त्याचा हा प्रयत्न असावा. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकांनीही या व्हिडीओला पसंती दिली आहे. 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

एका युजरने म्हटलं आहे की 'सर्वांना वाटत आहे की नवरदेवाने नववधूला पडण्यापासून वाचवलं, पण मला वाटतं की त्याने किला किस करत आपली फजिती होण्यापासून वाचवलं'. तर एका युजरने पत्नीला पडू न दिल्याबद्दल कौतुक केलं आहे.